Join us

Priyanka Chopra: पूलमध्ये कुटुंबासोबत मस्ती करताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:16 IST

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने तिच्या लाडक्या लेकीसोबतचे फोटो शेअर केला आहे. ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या पर्सनल लाईमुळेही चर्चेत असते. प्रियंका एक अभिनेत्री असण्यासोबतच आई देखील आहे आणि तिच्या मुलीचे नाव मालती आहे, जिचा चेहरा अजून चाहत्यांनी पाहिलेला नाही. पण ती तिच्या  लाडक्या लेकीसोबतचे फोटो शेअर करत असते. प्रियंका चोप्राने आपल्या मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये  प्रियंका निक आणि मालती तिघेही दिसतायेत. यादरम्यान अभिनेत्री पती आणि मुलीसोबत पूलमध्ये एन्जॉय करत आहे. मात्र, या फोटोतही प्रियंका चोप्राने तिच्या  मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. छोट्या मालतीचा चेहरा हार्ट इमोजीने लपवला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री नुकतेच 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट यावर्षी १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका 'जी ले जरा' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीनिक जोनास