ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या चित्रपटांमुळे नाही तर जोनास ब्रदर्सच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. होय, अलीकडे मिसेस जोनास अर्थात प्रियंका चोप्राने हॉलिवूड म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या दुनियेत धमाकेदार डेब्यू केलाय. नुकताच जोनास ब्रदर्सचा म्युझिक व्हिडीओ ‘सकर’ रिलीज झाला. जोनास ब्रदर्सच्या या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडीओमध्ये प्रियंका पती निक जोनाससोबत दिसली. लग्नानंतर पती निक जोनाससोबतचा प्रियंकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. विशेष म्हणजे, या व्हिडीओरवरचे अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या यापैकीच एक भन्नाट व्हिडीओ खुद्द प्रियंकाला आवडला. इतका की, तिने आपल्या सोशल अकाऊंटवर तो शेअर केला. यात ‘सकर’च्या व्हिडीओत बॉलिवूड चित्रपट ‘हम साथ साथ है’चे टायटल ट्रॅक मिक्स करण्यात आले आहे.
प्रियंका चोप्राने शेअर केले जोनास ब्रदर्सच्या ‘सकर’चे ‘हम साथ साथ है’ व्हर्जन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 15:58 IST
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या चित्रपटांमुळे नाही तर जोनास ब्रदर्सच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. होय, अलीकडे मिसेस जोनास अर्थात प्रियंका चोप्राने हॉलिवूड म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या दुनियेत धमाकेदार डेब्यू केलाय.
प्रियंका चोप्राने शेअर केले जोनास ब्रदर्सच्या ‘सकर’चे ‘हम साथ साथ है’ व्हर्जन!
ठळक मुद्दे. लवकरच प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ हा तिचा बॉलिवूडपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.