‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा बॉलिवूड करिअरला हळूहळू ओहोटी लागली असली तरी हॉलिवूडमध्ये मात्र तिने आपले स्थान पक्के केले आहे. होय, ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेने प्रियंका ग्लोबल स्टार बनली. या मालिकेतील प्रियंकाची भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. या मालिकेनंतर प्रियंका हॉलिवूडमध्ये अशी काही रमली की, बॉलिवूडकडे तिचे दुर्लक्ष झाले. ‘क्वांटिको’चे तिसरे सीझन संपल्याच्या दोन वर्षांनंतर प्रियंका आणखी एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर यासाठी तिने भरभक्कम फी घेतल्याचे कळतेय. अॅमेझॉनसोबत प्रियंकाने दोन वर्षांची ‘मल्टीमिलियन डॉलर फर्स्ट लूक टेलिव्हिजन डिल’ फायनल केली आहे. प्रियंकाने स्वत: ही माहिती दिली.
या डिलनंतर प्रियंका अॅमेझॉनसोबत मिळून कंटेन्टमध्ये अॅक्टिंग आणि प्रॉडक्शन करेन. 2012 मध्ये हॉलिवूडमध्ये व्हॉईस अॅक्टर म्हणून डेब्यू करणाºया प्रियंकांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.प्रियंकाने लिहिले, ही बातमी शेअर करताना मला आनंद आणि अभिमान वाटतोय. एक कलाकार व निर्माती या नात्याने मी कायम जगभरातील प्रतिभावंताना एक खुले आकाश मिळावे, असे स्वप्न पाहिले आहे. माझ्या प्रॉडक्शन हाऊसचा हाच उद्देश राहिला आहे आणि आम्ही अॅमेझॉनसोबत या रोमांचक प्रयत्नांचा शुभारंभ केला आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासातील हा एक मोठा टप्पा आहे.
ही डिल साईन करण्यापूर्वीच प्रियंका अॅमेझॉनसोबत दोन आणखी टीव्ही प्रोजेक्ट करतेय. यातल्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये प्रियंकाचा पती निक जोनास प्रोड्यूसर आहे. दुसºया प्रोजेक्टमध्ये प्रियंका रिचर्ड मॅडेनसोबत दिसणार आहे.
प्रियंकाने 2012 मध्ये डिज्नीच्या एका अॅनिमेशन प्रोजेक्टला स्वत:चा आवाज दिला होता. म्हणजेच हॉलिवूडमध्ये एक व्हाईस अॅक्टर म्हणून तिचा डेब्यू झाला होता. 2016 मध्ये तिला क्वांटिको सीरिज मिळाली. यानंतर हॉलिवूडमध्ये तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.