Priyanka Chopra Stealing Habbit: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियंका पर्सनल किंवा प्रोफेशनल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने आता हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने पर्सनल आयुष्याबाबत अनेक मजेदार खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने सांगितले की ती पती निक जोनास (Nick Jonas)च्या अनेक गोष्टी चोरते.
सध्या अभिनेत्री तिच्या सिटाडेल या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान अभिनेत्री अनेकवेळा पती निकच्या कपड्यांमध्ये दिसली आहे. प्रियंकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनमोकळेपणाने बोलले. प्रियंकाने सांगितले की, तिने निकच्या वॉर्डरोबमधून जवळपास सर्व काही चोरते. अभिनेत्री म्हणते की, मी खूपवेळा माझ्या पतीचे कपडे घालते. मी त्याचे सर्व जॅकेट्स आणि चष्मा घातलते. इतकंच नाही तर प्रियंकाला निकचे शूज चोरून ते घालायचे असतात पण ते तिला होत नाहीत.
निकसोबत कपडे शेअर करण्याबाबत एलिट डेलीशी बोलताना प्रियांका म्हणाली, 'ती त्याच्या वॉर्डरोबमधून जवळपास सर्व काही चोरते. मी माझ्या पतीचे कपडे नेहमी घालते. मला त्याचे शूज होत नाही, नाहीतर मी त्याचे सर्व शूज घेतले असते. मी त्याचे जॅकेट घालते. मी त्याचा चष्मा चोरला.'
प्रियंका आणि निक नुकतेच त्यांची मुलगी मालतीसोबत मेक्सिकोमध्ये होते जिथे त्यांनी प्रियांकाचा वाढदिवस साजरा केला. वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर प्रियंका लवकरच सिटाडेल या रुसो ब्रदर्स निर्मित सिरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'एंडिंग थिंग्ज' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटात अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.