Join us

प्रियंका चोप्राच्या 'त्या' कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, सर्वत्र होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:57 IST

प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रियंकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडही गाजवलं आहे. सध्या प्रियंका ...

प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रियंकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडही गाजवलं आहे. सध्या प्रियंका भारतात आहे. तिच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकतोय. तो अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत लग्न करणार आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत.  प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधील प्रियंकाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

सध्या प्रियंकाचा असाच एक व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहे. नुकतंच प्रियंका स्ट्रॅपलेस गाऊन घालून संगीत कार्यक्रमासाठी पोहचली. यावेळी पापाराझींसमोर आपल्या सासू-सासऱ्यासोबत तिनं पोझ दिल्या. प्रियंकाची सासू डेनिस जोनास या गुलाबी रंगाच्या साडीत दिसल्या. यावेळी प्रियंका त्यांच्या साडीचा पदर नीट करताना पाहायला मिळाली. प्रियंकाला आपल्या सासूबद्दल असलेली काळजी पाहून चाहते खूश झालेत.  तिचा हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. 

प्रियंका तिच्या भावाच्या लग्न समारंभात प्रचंड आनंदी दिसतेय. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या फंक्शनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. गेल्या वर्षी सिद्धार्थचा नीलम उपाध्यायशी साखरपुडा झाला होता. प्रियंका तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत या सोहळ्याला उपस्थित होती.  सिद्धार्थची होणारी पत्नी नीलम ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने अनेक तेलुगू व तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नीलम व सिद्धार्थ मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड