‘पद्मावती’ वादावर बोलली प्रियंका चोपडा; संजय लीला भन्साळींबद्दल केले हे वक्तव्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 2:53 PM
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा काही दिवसांपूर्वीच भारतात आली आहे. आपल्या परिवारासमवेत ख्रिसमस साजरा करण्यासाठी ती ...
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा काही दिवसांपूर्वीच भारतात आली आहे. आपल्या परिवारासमवेत ख्रिसमस साजरा करण्यासाठी ती भारतात आली असली तरी, अनेक इव्हेंटमध्ये ती सध्या हजेरी लावत आहे. दरम्यान प्रियंका एका इव्हेंटमध्ये आली असता तिने ‘पद्मावती’ वादावर आपले मत माडले आहे. प्रियंकाने म्हटले की, मला अपेक्षा आहे ‘पद्मावती’चा वाद लवकरच मिटेल. त्यामुळे लोकांना या चित्रपटातील कलाकृती नक्कीच बघायला मिळेल. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात काम करणाºया प्रियंकाने म्हटले, मी नेहमीच निर्मात्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. दरम्यान, ‘पद्मावती’ला अद्यापपर्यंत सीबीएफसीकडून प्रमाणपत्र दिले गेले नाही. राजपूत संघटना आणि काही राजकीय नेत्यांनी इतिहासात दिग्दर्शकाने छेडछाड केल्याचा आरोप करीत ‘पद्मावती’ला विरोध केला. प्रियंकाने संजय लीला भन्साळी यांच्या बाजूने बोलताना म्हटले की, ‘माझे संजय सरसोबतचे संबंध अविस्मरणीय आहेत. मी त्यांची खूप मोठी चाहती आणि समर्थक आहे. मला माहिती आहे हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि प्रेक्षक या चित्रपटातील सुरेख कलाकृती बघू शकतील.’ पुढे बोलताना प्रियंकाने म्हटले की, ‘मला असे वाटते, त्यांनी लोकांना आश्वस्त करायला हवे की, त्यांनी सर्व काही योग्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी संजय सर यांच्याबाजूने तर उभी राहणारच शिवाय दीपिका, रणवीर आणि शाहिदचेही समर्थन करणार आहे. यावेळी प्रियंकाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत विवाहाच्या बंधनात अडकणाºया अनुष्का शर्मालाही शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तिने अभिनेत्री मेनग मर्केल हिचेही ब्रिटनचे राजकुमार हॅरी याच्याशी साखरपुडा केल्यावरून अभिनंदन केले. दरम्यान, प्रियंका सध्या भारतात असून, ती तिच्या बॉलिवूडपटांवर काम करण्याची शक्यता आहे. प्रियंकाने दोन बॉलिवूडपट साइन केले असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच समोर आली होती, परंतु वेळेअभावी ही चर्चा अर्धवटच राहिली आहे. आता प्रियंका या चित्रपटावर काम करेल असेच काहीसे चिन्ह दिसत आहे.