Join us

​प्रियांका चोप्राला हवा असा मि. राईट !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 8:35 AM

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही यशाच्या पताका फडकविणारी अभिनेत्री म्हणजे, प्रियांका चोप्रा. ‘बेवॉच’नंतर तिच्या हाती दुसरा हॉलिवूड सिनेमा लागला आहे. या चित्रपटाच्या ...

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही यशाच्या पताका फडकविणारी अभिनेत्री म्हणजे, प्रियांका चोप्रा. ‘बेवॉच’नंतर तिच्या हाती दुसरा हॉलिवूड सिनेमा लागला आहे. या चित्रपटाच्या शूटींगमध्ये सध्या ती व्यस्त आहे. प्रियांकाने कधीचीच तिशी ओलांडली आहे. आज ती ३४ वर्षांची आहे. आता आम्ही अचानक प्रियांकाच्या वयाचा उल्लेख करावा, हे अनेकांच्या पचनी पडणार नाही. पण आपल्या देशात वयाचा आणि लग्नाचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे लग्नाचा विषय म्हटल्यावर प्रियांकाच्या वयाचा उल्लेख करणे आम्हास भाग पडले. प्रियांका कधी लग्न करणार, याकडे तिच्या अख्ख्या चाहत्यांचे लक्ष लागले आहेच. साहजिक प्रियांका जिथे जाईल तिथे तिला लग्नाबद्दल हमखास विचारले जाते. ताज्या मुलाखतीतही प्रियांकाला हाच प्रश्न विचारला गेला. तू लग्न कधी करणार आणि तुला कसा लाईफ पार्टनर हवा? असे प्रियांकाला विचारले गेले. यावर प्रियांकाने अगदी शानदार उत्तर दिले. माझ्या आयुष्यात काहीही लपलेले नाही. मी लग्न करणार, हे नक्की आहे. पण मी माझ्या कामावर सर्वाधिक प्रेम करते. माझ्या कामाची पद्धत आणि कमिटमेंट हँडल करणे, प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. त्यामुळे माझा लाईफ पार्टनर यादृष्टीने मला समजून घेणारा आणि मला पाठींबा देणारा असावा, असे मला वाटते. रिलेशनशिप दोन लोक मिळूनच यशस्वी करू शकतात, यावर माझा विश्वास आहे. माझ्यासाठी समजून घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे प्रियांका म्हणाली. आता प्रियांकाचा मिस्टर राईट कसा असेल, हे तर कळले. पण प्रियांका लग्न कधी करणार, हे मात्र कळले नाही.  प्रियांकाला तिच्या स्वप्नातला हा मिस्टर राईट मिळो आणि आपल्याला तिच्या लग्नाची गोड बातमी लवकरात लवकर कळो!ALSO READ : ​ प्रियांका चोप्रा म्हणते, माझ्या यशावर केवळ माझा हक्क !