Priyanka Chopra-Shahid Kapoor Breakup: बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि हँडसम हंक शाहिद कपूर एकमेकांना डेट करत होते. दोघांची जोडीही लोकांना खूप आवडली होती. दोघांचं ब्रेकअप नेमकं का झालं याचं कारण लोकांना कळू शकलं नाही. जेव्हा हे कपल वेगळं झालं तेव्हा त्यांच्या चाहते नाराज झाले होते. शाहिद आणि प्रियंकाने 'कमीने' आणि 'तेरी मेरी कहानी' सारख्या चित्रपटात काम केलं. 'कमीने' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघे जवळ आले.
हिट होती दोघांची जोडी 'कमिने' हा चित्रपट सुपरहिट ठरला, त्यानंतर त्यांच्या जोडीची चर्चा सर्वत्र रंगू लागली. इतकेच नाही तर दोघे करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये एकत्र दिसले होते. 2011 मध्ये जेव्हा प्रियंकाच्या घरावर आयकरने छापा टाकला होता, तेव्हा शाहिदही तिच्यासोबत होता. खुद्द प्रियंकानेही तुमच्या कोर्टात हे मान्य केले होते. प्रियंकाने सांगितले की, शाहिद हा एकमेव सेलिब्रिटी आहे जो तिच्या घराजवळ राहत होता. त्यामुळे तिने आधी त्याला बोलावून घेतले.
या कारणामुळे झाले होते ब्रेकअपगोव्यात एका खाजगी समारंभात शाहिद आणि प्रियंका यांची एंगेजमेंट झाल्याची बातमी आली होती आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. असे म्हटले जाते की, एंगेजमेंटनंतर प्रियांका 'अंजाना अंजानी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आणि रणबीर कपूरसोबत तिची जवळीक वाढू लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिदने प्रियंकाला रणबीरसोबत चित्रपटात काम करु नको असं सांगितलं होते, परंतु अभिनेत्रीने हे मान्य केले नाही. प्रियंकाला शाहिदचं हे वागणं पटलं नाही. तिने शाहिदसोबतचं नातं संपवणे चांगलं मानलं. दोघांची लाईफस्टाईल एकमेकांशी जुळत नसल्याचेही समोर आले. शाहिदला घरी राहणं आवडतं होते, तर प्रियंकाला पार्टी करायला आवडायचे. नंतर प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले, तर शाहिदने मीरा राजपूतला आपली जीवनसाथी बनवले.