अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. प्रियंकाचे जगभरात खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. सध्या ती आगामी सिनेमा सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियंकाला दुखापत झाली आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते खूप हैराण झाले आहेत.
प्रियंका चोप्राने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या कपाळावर जखमा पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर तिचे कपाळ रक्ताने माखलेले दिसत आहे. पहिला फोटो शेअर करत तिने कोणते खरे आणि कोणते खोटे असे कॅप्शन दिले आहे. दुसऱ्या फोटोत प्रियांकाने भुवयांमध्ये झालेली जखम खरी असल्याचे सांगितले आहे. तर कपाळावरी जखम ही खोटी असल्याचे म्हटले आहे.
या चित्रपटाआधी प्रियांकाने ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती मॅट्रिक्स ४मध्येही दिसणार आहे. या हॉलिवूडपटांशिवाय ती जी ले जरा या हिंदी चित्रपटात आलिया भट व कतरिना कैफसोबत झळकणार आहे.