प्रियांका चोप्राच्या ‘बेवॉच’वरही चालली सेन्सॉर बोर्डाची कात्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2017 7:07 AM
हॉलिवूड गाजवत असलेल्या प्रियांका चोप्राचा ‘बेवॉच’ हा पहिला-वहिला हॉलिवूडपट लवकरच रिलीज होतो आहे. प्रियांकाचे भारतातील चाहते तिच्या या हॉलिवूडपटाची ...
हॉलिवूड गाजवत असलेल्या प्रियांका चोप्राचा ‘बेवॉच’ हा पहिला-वहिला हॉलिवूडपट लवकरच रिलीज होतो आहे. प्रियांकाचे भारतातील चाहते तिच्या या हॉलिवूडपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटात आपल्याला खूप सारी अॅक्शन आणि हलकी फुलकी कॉमेडी पाहायला मिळणार आहे. अर्थात तरिही या चित्रपटाला ‘यू/ए’ वा ‘यू’ सर्टिफिकेट नाही तर ‘ए’ सर्टिफिकेट मिळाले आहे. भारतीय सेन्सॉर बोर्डाने प्रियांकाच्या या हॉलिवूडपटामध्ये पाच कट सुचवले आहेत. या पाच कटनंतरच ‘बेवॉच’ भारतात प्रदर्शित होऊ शकणार आहे. ALSO READ : ...पुन्हा बिकिनी अवतारात दिसली प्रियंका चोपडा!!सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी ही माहिती दिली. ‘बेवॉच’ या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळाले आहे. अर्थात या चित्रपटात खूप सारे बिकनी सीन्स आहेत, म्हणून ‘ए’ सर्टिफिकेट दिले गेलेले नाही तर यातील काही संवाद व शब्द यामुळे त्यास हे सर्टिफिकेट दिले गेले आहे. ‘बेवॉच’मध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द आहेत. यापैकी अनेक अनावश्यक शब्द गाळण्याचे आम्ही सुचवले आहे. काही सीन्समध्ये काही शब्द तसेच ठेवण्यात आले आहेत. कारण यामुळे चित्रपटाची मज्जाच गेली असते,असे बोर्डाला वाटले. बिकनी सीन्समुळे नाही तर यातील भाषेमुळे या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट द्यावे लागले, असे त्यांनी सांगितले.येत्या २ जूनला हा चित्रपट भारतात रिलीज होत आहे. अमेरिकेतील सगळ्यांत लोकप्रीय टीव्ही सीरिजवर बेतलेल्या या हॉलिवूडपटात ड्वेन जॉनसन आणि जॅक इफरॉन सारखे हॉलिवूड स्टार्स आहेत. प्रियांका सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रियांकाचा हा हॉलिवूडपट भारतीयांच्या किती पसंतीत उतरतो, ते लवकरच आपण पाहणार आहोत. तूर्तास या चित्रपटासाठी प्रियांकाला शुभेच्छा देऊ यात!