Join us

प्रियंका चोप्राच्या सासूला पाहिलंत का? वय वर्षे ५८ पण डेनिस जोनसच्या सौंदर्यापुढे तरुणीही फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:48 IST

प्रियंकाच्या सासूबाई स्टाईल आणि ग्रेसच्या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा अजिबात कमी नाहीत. वयाच्या ५८ व्या वर्षीही त्या खूपच स्टायलिश आहे.

Priyanka Chopra: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपला ठसा उमटवणारी प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकला. त्यानं गर्लफ्रेंड नीलम उपाध्याय सोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सिद्धार्थ आणि नीलमच्या लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नात देसी गर्ल ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. पण तिच्या सासूने ( Denise Miller-jonas) सगळी लाइमलाइट चोरली. सोशल मीडियावरही प्रत्येकजण अभिनेत्रीच्या सासूचे कौतुक करताना दिसत आहेत.

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थचं ७ फेब्रुवारी रोजी लग्न पार पडलं.  यासाठी केवळ प्रियंकाच नाही तर तिचा पती निक आणि तिचे कुटुंबही भारतात आलं होतं. प्रियंका चोप्राच्या सासरच्या लोकांनाही सिद्धार्थच्या लग्नाचा खूप आनंद घेतला. देसी गर्लसोबतच तिची सासू डेनिस जोनास यांच्या लूकचीही खूप चर्चा झाली आहे. अभिनेत्रीची सासू डेनिस जोनास या मेहंदी समारंभात गुलाबी रंगाच्या साडीत दिसल्या. ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. 

संगीत सोहळ्यात त्या अतिशय ग्लॅमरस लूकमधअये पाहायला मिळाल्या. त्यांनी ऑफ शोल्डर लाँग गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती प्रियंकाला टक्कर देताना दिसल्या.  डेनिस जोनास कॅमेऱ्यासमोर आल्या, तेव्हा कोणीही त्यांच्यावरून नजर हटवू शकलं नाही. हे फोटो पाहिल्यानंतर चाहतेही त्यांच्या फिगर आणि सौंदर्याचे वेडे झाले आहेत. प्रियंकाच्या सासूबाई स्टाईल आणि ग्रेसच्या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा अजिबात कमी नाहीत. वयाच्या ५८ व्या वर्षीही त्या खूपच स्टायलिश आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड