Priyanka Chopra: बडे लोग बडी बाते... असं काही उगाच म्हणत नाहीत. असंच काहीसं आहे अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिचं. नुकतंच प्रियंकाच्या गळ्यात कोटींचा हार पाहायला मिळाला आहे. तिच्या गळ्यातील हार सर्वांच्याच नजरेत भरणारा होता. प्रियंकानं परिधान केलेला हा हार तिच्या लूकला अगदी साजेसा होता. तो तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होता. पण, या हाराची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल.
प्रियंका चोप्राचाच्या घरी लगीनघाई सुरू आहे. तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी आज ७ फेब्रुवारी रोजी लग्न करतोय. सिद्धार्थच्या मेहंदी समारंभ, हळदी व संगीत समारंभातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियंकानं भावाच्या मेंहदी कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. यावळी तिनं ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. या गाऊनवर अत्यंत प्रभावी आणि मोहक वाटणारा हा हार तिनं घातला. या हाराची किंमत तब्बल १२ कोटी आहे.
प्रियंका ही एक खरी फॅशनिस्टा आहे. तिची प्रत्येक गोष्ट ही खास असते. एखाद्या अप्सरेसारखा तिने लुक केला होता. प्रियंकाच्या चेहऱ्यावरून नजरच हटत नाहीये. तिच्याच नावाची सगळीकडे चर्चा दिसून येत आहे. प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायच झालं तर, प्रियंका एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' या चित्रपटात महेश बाबूसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी तिनं तब्बल ३० कोटी एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे. तथापि, सिनेमाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.