Join us  

Priyanka Nick Wedding: लग्नापूर्वी प्रियांकाच्या घरी गणेश पुजा, कुटुंबासह पोहोचला निक !!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 2:05 PM

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लग्नघटिका जवळ आलीय, लगीनघाई सुरु झालीय. जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका व निक लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वी प्रियांकाच्या वर्सोवा येथे राज क्लासिक या जुन्या घरी आज गणेश पूजेचे आयोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रियांकाची देवावर अपार श्रद्धा आहे. लग्नविधी निर्विघ्न पार पडावेत, अशी तिची इच्छा आहे. याचमुळे लग्नविधी सुरु होण्यापूर्वी या खास गणेश पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लग्नघटिका जवळ आलीय, लगीनघाई सुरु झालीय. जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका व निक लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वी प्रियांकाच्या वर्सोवा येथे राज क्लासिक या जुन्या घरी आज गणेश पूजेचे आयोजन करण्यात येत आहे. निक आणि प्रियांका दोघेही या पूजेसाठी राज क्लासिक येथे पोहोचले आहेत. यावेळी प्रियांकाने लाईट ब्ल्यू कलरच्या सलवार-कुर्ता कॅरी केला होता तर निकने लाईट पिंक कलरचा कुर्ता घातला होता. 

निकचा मोठा भाऊ जो जोनास आणि त्याची पार्टनर सोफी टर्नर हेही या पूजेसाठी पोहोचले आहेत. प्रियांकाची देवावर अपार श्रद्धा आहे. लग्नविधी निर्विघ्न पार पडावेत, अशी तिची इच्छा आहे. याचमुळे लग्नविधी सुरु होण्यापूर्वी या खास गणेश पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

तूर्तास मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका व निकच्या संगीत सेरेमनीचा व्हेन्यू ऐनवेळी बदलण्यात आला. आधी हळद व मेहंदी मेहरानगड किल्लयात होणार होते. पण आता हे सगळे सेरेमनी जोधपूरच्या उमेद भवन येथेच होणार असल्याचे कळतेय.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा येत्या २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे.  

लग्नात सामील होणाºया पाहुण्यांना प्रियांका व निक एक खास भेट देणार आहेत. होय, या पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे.

या नाण्याच्या एका बाजूला ‘एनपी’ म्हणजे निक व प्रियांका या नावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहिलेले असेल. तर दुसºया बाजूला गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असेल.अद्याप प्रियांका व निकने लग्नाची अधिकृत तारीख जाहिर केलेली नाही. मात्र उद्या २९ नोव्हेंबरपासून या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. यासाठी जोधपूरचे उमेद भवन पाच दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास