प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. लग्नाच्या मुहूर्तापासून लग्नस्थळापर्यंत सगळे काही पक्के आहे. प्रियांकाचे मुंबईतील घरही नववधूप्रमाणे नटले आहे. इतकेच नाही तर आता या शाही लग्नासाठी पाहुणे येणेही सुरु झाले आहे. होय, काल प्रियांका चोप्राची होणारी जाऊबाई सोफिया टर्नर आणि जेठ जो जोनास असे दोघेही मुंबईत पोहोचले. मुंबई विमानतळावर त्यांना पाहिले गेले. यावेळी दोघेही प्रियांका व निकच्या लग्नासाठी चांगलेच उत्साहित दिसले. सोफियाने तर मीडियाला पाहून हातही उंचावला.
सोमवारी रात्री प्रियांका, निक, जो, सोफिया, परिणीती चोप्रा आणि काही जवळच्या मित्रांची डिनर पार्टी चांगलीच रंगली.
या पार्टीचा एक फोटो निकने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे आणि त्यास मुंबई नाईट्स असे कॅप्शन दिले.
आलिया भट्टही यावेळी दिसली. तिनेही या डिनर पार्टीला हजेरी लावली.
जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका लग्न करणार आहे. वेडिंग वेन्यूपर्यंत प्रियांका व निक दोघेही हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. लग्नाचे व-हाडीही जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनेच थेट वेडिंग मेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे उमेद पॅलेसमध्ये एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे.
निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय. २९ नोव्हेंबरला प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी रचेल. यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. यात केवळ प्रियांका व निकचे जवळचे मित्र व नातेवाईक सामील होतील. १ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे. लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.