देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या आयुष्यात आजचा दिवस खास आहे. प्रियांकाने आज आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासच्या नात्याला घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईत प्रियांकाची रोका सेरेमनी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
रोका सेरेमनीमध्ये प्रियांकाच्या काही जवळच्या व्यक्ती सामील झाल्या होत्या. परिणीती चोप्रा प्रियांकाचा मित्र मुश्ताख शेख आणि सलमानची बहिण अर्पिता खानदेखील दिसली. प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी आपल्या लेकीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रियांकाच्या साखरपुड्याच्या आधी एका इंटरव्हु दरम्यान मधु चोप्रा म्हणाल्या होत्या की, कोणतेही लग्न हळूहळू मजबूत होते आणि प्रत्येक दिवस आयुष्यातल्या व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला पाहिजे. कोणत्याही पतीने आपल्या पत्नीच्या आरोग्याची आणि आनंदाची काळजी घेतली पाहिजे. दोघांनीही एकमेकांशी भांडण्यापेक्षा बसून कोणत्याही विषयावर बसून बोलावं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण प्रियांकाने ही बाब अनेकांपासून लपवली. मात्र आता प्रियंकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियंका रिंग दिसते आहे.
सोशल मीडियावर हा फोटो येताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या फोटोत प्रियांकाने डायमंड रिंग घातल्याचे दिसत आहे. या रिंगवरुनच तिचा साखरपुडा झाल्याचं पक्क मानलं जात आहे. अशातच आता या रिंगच्या किंमतीची चर्चा होऊ लागली आहे. harpersbazaar.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल २०० हजार डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय किंमत १.५ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय जेमोलोजिस्टनुसार, ही ५ कॅरेटची रिंग आहे. रिंगमध्ये असलेल्या डायमंडला कुशन कट डायमंड म्हटले जाते. हा डायमंड सर्वात महागड्या डायमंडपैकी एक आहे.