अभिनेता सनी देओल (Sunny Deol) 'गदर 2' च्या यशानंतर पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाला आहे. त्याच्याकडे आगामी सिनेमांची रांग आहे जे येत्या काही वर्षात रिलीज होणार आहेत. दरम्यान सनी देओल हे यश एन्जॉय करत असतानाच त्याच्यावर एका निर्मात्याने फसवणूकीचा आरोप लावला आहे. सनीने करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा दावा निर्मात्याने केला आहे.
सौरव गुप्ता या निर्मात्याने नुकतंच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये खुलासा केला की,"सनी देओलने 2016 साली एका सिनेमासंबंधित डील साईन केली होती. सनी स्वत: तो सिनेमा करणार होता ज्यासाठी त्याने 4 कोटी मागितले होते. आम्ही त्याला 1 कोटी अॅडव्हान्स दिले. मात्र सिनेमाचं काम सुरु करण्याऐवजी त्याने 2017 साली पोस्टर बॉईज सिनेमात काम केलं. त्याने माझ्याकडे आणखी पैसै मागितले आणि आतापर्यंत मी त्याला 2.55 कोटी रुपये दिले आहेत. त्याने मला दुसऱ्या दिग्दर्शकांनाही पैसे द्यायला लावले आणि फिल्मीस्तान स्टुडिओ बुक केला."
निर्माते पुढे म्हणाले, "सनीने गेल्या आमच्यासोबत खोटं अॅग्रीमेंट केलं. जेव्हा अॅग्रीमेंट वाचलं तेव्हा पाहतो तर काय त्याने एक पानच बदललं होतं. जिथे 4 कोटी जागी 8 कोटी लिहिलं आणि प्रॉफिट २ कोटी केलं."
'जानवर','अंदाज' सारखे चित्रपट बनवणारे फिल्ममेकर सुनील दर्शन यांनीही सौरव गुप्ताला पाठिंबा दिला. ते देखील पत्रकार परिषदेत होते. त्यांनाही सनी देओलचा असाच अनुभव आला असल्याचं ते म्हणाले. सौरव गुप्ता यांनी सनी देओलविरोधात तक्रार दाखल केली आहे. 30 एप्रिलला सनीला नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र तेव्हा त्याने भारताबाहेर असल्याचं कारण दिलं होतं.