Join us

प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक जॉनी बख्शी यांचंं निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:01 PM

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक जॉनी बख्शी यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक जॉनी बख्शी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. शुक्रवारी 4 सप्टेंबरला रात्री त्यांच निधन झाले आहे. जॉनी बख्शी यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. जॉनी बख्शी हे केवळ एक उत्तम दिग्दर्शकचं नव्हते तर ते निर्मातादेखील होते. राजेश खन्ना आणि गुलशन ग्रोव्हर 'खुदाई' सिनेमाची निर्मिती त्यांनीच केली होती.  

अनेक सिनेमांची केली निर्मिती

जॉनी यांनी मंजिलें और भी हैं, मेरा दोस्त मेरा दुश्मन, फिर तेरी कहानी याद आई आणि इस रात की सुबह नही सारख्या अनेक सिनेमांचे ते निर्माता आणि सहनिर्माता होते. जॉनी बख्शी यांनी आपल्या करिअर केलेल्या अखेरचा सिनेमा 'कजरारे'. हा सिनेमा 2010मध्ये आला होता. त्यात हिमेश रेशमियासह सारा लोरेन आणि अमृता सिंगची मुख्य भूमिका होती.  जॉनी बख्शी या सिनेमाचे कार्यकारी निर्माते होते. या व्यतिरिक्त जॉनी बख्शी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनचा (आयएमपीपीए) भाग होते. जॉनी बख्शी यांचं सिनेमावर विशेष प्रेम होते, ऐवढेच नाही तर हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मार्लोना ब्रँडोशी प्रेरणा घेऊन आपल्या मुलाचे नाव ब्रँडो ठेवले.  

टॅग्स :बॉलिवूड