सरत्या वर्षात बॉलिवूड जगतातून एक दु:खद बातमी समोर येते आहे, चित्रपट निर्माते नितिन मनमोहन (Nitin Manmohan) यांचं निधन झालंय. गुरुवारी सकाळी मुंबईत त्यांचं निधन झालंय. ते ६० वर्षांचं होते. ३ डिसेंबरपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि गेले १५ दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात होते दाखलज्येष्ठ चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. नितीन मनमोहन यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
अनेक मोठ्या चित्रपटांची केली होती निर्मिती नितीन मनमोहन हे चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक मनमोहन यांचं पुत्र होते. ज्यांना 'ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना'सह अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. वडिलांप्रमाणे नितीन मनमोहनही चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली. यामध्ये 'बोल राधा बोल' (1992), 'लाडला' (1994), 'यमला पगला दीवाना' (2011), 'आर्मी स्कूल', 'लव के लिए कुछ भी करेगा' (2001), 'दस' (2005) यांचा समावेश आहे. , 'चल मेरे भाई' (2001), 'महा-संग्राम' (1990), 'इन्साफ: द फायनल जस्टिस' (1997), 'दिवांगी', 'नई पडोसन' (2003), 'अधर्म' (1992), ' बागीमध्ये 'ईना मीना दीका', 'अस्तू', 'टँगो'सारख्या अनेक मोठे चित्रपटांचा समावेश आहे.