Join us

'83' चित्रपटाचे निर्माते अडचणीत, दीपिका पादुकोणसह सर्व निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 3:45 PM

कबीर खानने दिग्दर्शित केलेला '83' हा चित्रपट 1983च्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. हा चित्रपट येत्या 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

मुंबई: अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '83' रिलीजपूर्वीच अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही नाव आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) एका फायनान्सरने मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन '83' चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, तक्रारदाराने विब्री मीडियासोबत चित्रपटात गुंतवणुकीचा करार केला होता. त्यांना चित्रपटातील गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी चित्रपटात 16 कोटी रुपये गुंतवले. मात्र आता निर्मात्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आता पोलिसांनी आयपीसीच्या कलम 405, 406, 415, 418, 120 आणि 120बी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराचे वकील काय म्हणाले?

तक्रार दाखल करणाऱ्या फायनान्सरचे वकील रिझवान सिद्दीकी म्हणाले, "माझ्या क्लायंटने '83' चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याची तक्रार दाखल केली आहे. माझ्या अशिलाकडे कायदेशीर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुरुवातीला आम्ही आमच्या स्तरावर मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला, निर्मात्यांसोबत चर्चा केली. पण, एकाही निर्मात्यांने माझ्या क्लायंटचे ऐकले नाही, म्हणूनच आम्ही कोर्टात धाव घेतली आहे."

निर्माते विष्णुवर्धन इंदुरी म्हणतात...याबाबत बोलताना चित्रपटाचे निर्माते विष्णुवर्धन इंदुरी म्हणाले की, तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तक्रारकर्त्याला आधीच 83 चित्रपटांच्या प्रदर्शनावर आणि त्याच्याशी संबंधित व्यावसायिक कार्यक्रमांवर प्रभाव टाकण्यापासून रोखले आहे. त्यामुळे मुंबई न्यायालयातील खटला तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. त्यामुळे आता कोर्टात यावर काय कारवाई होणार, हे पाणे महत्वाचे आहे.

24 डिसेंबरला रिलीज होणार'83'कबीर खानने दिग्दर्शित केलेला 83 हा चित्रपट 1983 च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयावर आधारित आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर आणि एमी विर्क सारखे कलाकार दिसणार आहेत. 

टॅग्स :बॉलिवूड८३ सिनेमादीपिका पादुकोण