Join us

फ्लाइटमध्ये केलं प्रपोझ, मग लग्न, आता तब्बल १८ वर्षांनंतर फरदीन खान पत्नी नताशाला देतोय घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 3:16 PM

Fardeen Khan And Natasha Madhvani : बॉलिवूडमधील आणखी एक कपल घटस्फोट घेत असल्याची बातमी समोर येत आहे. नव्वदच्या दशकातील चॉकलेट हिरो फरदीन खान आणि त्याची पत्नी नताशा माधवानीने लग्नाच्या १८ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) आणि त्याची पत्नी नताशा माधवानी (Natasha Madhvani) यांनी लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. २००५ मध्ये सुपरस्टार फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानने प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशासोबत लग्न केले होते. असे सांगितले जात आहे की काही वर्षांपूर्वी त्यांच्या नात्यात काही दुरावा निर्माण झाला होता आणि त्यानंतर ते दोघे वेगळे राहत होते. फरदीन त्याच्या आईसोबत मुंबईत राहत होता, तर नताशा लंडनमध्ये मुलांसोबत राहत होती. घटस्फोटाच्या वृत्ताला दोघांनी अधिकृत दुजोरा दिला नसला तरी दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

एकेकाळी फरदीन खानच्या अनेक चित्रपटांनी खूप यश मिळवले होते. मात्र यानंतर त्याच्या करिअरला विराम मिळाला आणि तो बराच काळ बॉलिवूडच्या चर्चेपासून दूर होता. करिअरमधील अपयश आणि पत्नीसोबतचे मतभेद यामुळे हे विभक्त होत असल्याचे बोलले जात आहे. दोघेही एक वर्षाहून अधिक काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. फरदीन खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, दीर्घकाळ डेट केल्यानंतर नताशाला आपले जोडीदार बनवले होते. फरदीन खानने फ्लाइटमध्ये नताशाला प्रपोज केले आणि दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. या दोघांना दोन मुले आहेत. फरदीन आणि नताशाच्या मुलीचे नाव डायनी आणि मुलाचे नाव अझियस आहे. फरदीन अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. फरदीन खानची पत्नी नताशा माधवानी ही आपल्या काळातील सुंदर अभिनेत्री मुमताजची मुलगी आहे. 

फरदीन खानची फिल्मी कारकीर्दफरदीनच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने प्रेम अगन या दमदार चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्याचवर्षी या चित्रपटामुळे फरदीनला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर २०००च्या काळात त्याचे अनेक चित्रपट आले आणि तो चॉकलेट हँडसम बॉय म्हणून लोकप्रिय झाला. त्याच्या काही हिट चित्रपटांमध्ये अक्षय कुमारसोबत हे बेबी आणि उर्मिला मातोंडकरसोबत भूत यांचा समावेश आहे. त्यानंतर त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले आणि २०१० मध्ये तो दुल्हा मिल गया या चित्रपटात दिसला.

टॅग्स :फरदीन खान