रवींद्र मोरे
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संपूर्ण देश एकजुट झाला आहे. प्रत्येकाच्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आग ओसंडून वाहत होती. त्याचाच प्रत्यय म्हणून अलिकडेच भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून बालाकोट, चकोठी आणि मुजफ्फराबाद एलओसी स्थित दहशतवादी कॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. आणि दुसरीकडे बॉलिवूडनेही वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून या हल्ल्याचा बदला घेतला आहे. जाणून घेऊया त्या घटनांबाबत.
* पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये नो एन्ट्री
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बॉलिवूडमध्ये फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइजने तशी घोषणाही केली. त्याच पाठोपाठ आता आॅल इंडिया सिने वर्कर्स एसोसिएशनने देखील घोषणा केली की, जर कोणी पाकिस्तानी कलाकारासोबत काम केले तर त्याच्या विरोधात आॅल इंडिया सिने वर्कर्स एसोसिएशन कठोर कारवाई करेल. या निर्णयामुळे कदाचित कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये आता नो एन्ट्री असेल.
* बॉलिवूड चित्रपट पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय
पुलवामा हल्ल्याचा विरोध म्हणून बॉलिवूडचे चित्रपट पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात अलिकडेच भारतात रिलीज झालेला अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि अरशद वारसी स्टारर टोटल धमाल, तर आगामी राजकुमार राव आणि मौनी रॉय स्टारर ‘मेड इन चायना’, कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन स्टारर ‘लुका-छुपी’, सलमान खान स्टारर ‘भारत’ आणि सुशांतसिंह राजपुत स्टारर ‘सोनचिडिया’ या चित्रपटांचा समावेश आहे.
* बॉलिवूडमध्ये काळा दिवस साजरा
या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइजने गेल्या रविवारी मुंबई चित्रपटसृष्टीत जोरदार विरोध प्रदर्शन केले होते. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या सर्व कलाकारांनी काळा दिवस साजरा करत दोन तास काम बंद केले होेते. मीडिया रिपोर्टनुसार यावेळी अमिताभ बच्चन यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ची शूटिंग थांबविण्यात आली होती तर दुसरीकडे क्रिकेटर सेहवागनेही एक अॅड फिल्मची शूटिंग थांबविली होती.
* पाकिस्तानी सिंगर आतिफ असलमचे गाणे केले अनलिस्ट
एका म्युझिक कंपनीने पाकिस्तानी सिंगर आतिफ असलमच्या गाण्यांना अनलिस्ट केले आहे. आतिफच्या या गाण्यांना या म्युझिक कंपनीने यूट्यूबवर १२ फेब्रुवारी रोजी रिलीज केले होते. पुलवामा हल्ल्याच्या दुसºया दिवशीच या म्युझिक कंपनीने आपल्या यूट्यूब चॅनलवरुन या गाण्यांना अनलिस्ट केले. याचा फटका अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला बसला आहे.
* नवजोत सिंह सिद्धू आला अडचणीत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यांनतर नवजोत सिंह सिद्धने वक्तव्य करुन अडचणीत सापडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्यावर फिल्म सिटी मुंबईमध्ये त्याच्या एन्ट्रीवर बॅन लावण्याची मागणी करण्यात आली आहे. फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलाईज म्हणजेच एफडब्लूआईसीईने फिल्म सिटी प्रबंधकास एक पत्र पाठवून फिल्म सिटीमध्ये एन्ट्रीवर बॅन लावण्याची मागणी केली आहे. या अगोदरही कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूला विरोध होत होता. त्याची या शोमधूनही हकालपट्टी झाल्याचेही समजते.