Join us

शाहरुख खानच्या चाहत्यांनी उघडली #StopFakeNewsAgainstSRKची मोहिम; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 1:53 PM

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि शाहरूख ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. पण अशावेळी शाहरुखचे चाहते त्याच्या मदतीला आले आणि बघता बघता, ‘स्टॉप फेक न्यूज अगेन्स्ड एसआरके’ नावाचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.

ठळक मुद्दे‘शाहिद’, ‘सिटीलाईट्स’ यासारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक हंसल मेहताही शाहरूखच्या बाजूने मैदानात उतरले. त्यांनीही शाहरुखच्या बाजूने ट्वीट केले.

शाहरुख खान याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक संघर्षानंतर शाहरुखने इंडस्ट्रीत स्वत:चे एक स्थान निर्माण केले आणि बॉलिवूडचा ‘बादशहा’ बनला.  तूर्तास पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. शाहरुखने पाकिस्तानातील गॅस पीडितांना ४५ कोटींची मदत केली, असा दावा या व्हिडिओत केला जातोय. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर आक्रोश असताना शाहरूखचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शाहरूख ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. पण अशावेळी शाहरुखचे चाहते त्याच्या मदतीला आले आणि बघता बघता, ‘स्टॉप फेक न्यूज अगेन्स्ड एसआरके’ नावाचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. शाहरुखच्या चाहत्यांनी अनेक ट्वीट करत, हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगितले. तत्पूर्वी शाहरुखच्या टीमनेही या व्हिडिओत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

 केवळ चाहतेचं नाहीत तर ‘शाहिद’, ‘सिटीलाईट्स’ यासारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक हंसल मेहताही शाहरूखच्या बाजूने मैदानात उतरले. त्यांनीही शाहरुखच्या बाजूने ट्वीट केले.

शाहरुखविरोधात पसरवली जात असलेली ‘फेक न्यूज’ आत्ताच बघितली. मी यावर सध्या काहीही बोलणार नाही. केवळ #StopFakeNewsAgainstSRK  इतकेच म्हणेल. शाहरुख असा स्टार आहे जो, कुठलाही आव न आणता गरजूंची मदत करतो. मी मूर्ख लोकांना इतकेच सांगेल की, किंगखानविरोधात अशा खोट्या बातम्या पेरू नका, असे ट्वीट हंसल मेहता यांनी केले आहे. यापूर्वीही अनेकदा शाहरुखच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलेय.

 

टॅग्स :शाहरुख खानपुलवामा दहशतवादी हल्ला