Allu Arjun Film Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग सुपरडुपर हिट झाला होता. साहजिकच आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती पुष्पा २ ची. तुम्हीही या सिनेमाच्या प्रतीक्षेत असाल तर एक निराश करणारी बातमी आहे, होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा २’साठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ताज्या अपडेटनुसार, सध्या तरी ‘पुष्पा २’चं शूटींग ठप्प पडलंय आणि आणखी काही काळ ही स्थिती अशीच कायम राहणार आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पुष्पा २’चं शूटींग थांबवण्यात आलं आहे. गेल्या ३ महिन्यांपासून शूटींग थांबलंय. अद्यापही शूटींग सुरू झालेलं नाही. ‘पुष्पा २’चा काही भाग काही महिन्यांपूर्वी विजानमध्ये शूट करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शूटींग ठप्प आहे.रिपार्टनुसार, दिग्दर्शक सुकुमार सध्या ‘पुष्पा २’ च्या टीझरवर काम करत आहेत. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी म्हणजे येत्या ८ एप्रिलला हा टीझर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अशात आणखी एक बातमी कानावर येतेय. त्यानुसार, आत्तापर्यंत शूट केलेल्या सीन्सबद्दल दिग्दर्शक सुकूमार समाधानी नाहीत. काही सीन्स रिशूट करण्याचा त्यांचा विचार आहे. असं झालं तर ‘पुष्पा 2’चं प्रदर्शन आणखी लांबणार आणि चाहत्यांची प्रतीक्षाही वाढणार.
साहजिकच शूटींग सुरू होत नाही तोपर्यंत अल्लू अर्जुन त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रश्मिका मंदाना ही सुद्धा तिच्या अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. अद्याप मेकर्सनी ‘पुष्पा २’च्या रिलीज डेटची घोषणा केलेली नाही. पण हा सिनेमा पुढील वर्षाच्या सुरूवातीला रिलीज होऊ शकतो, अशी चर्चा आहे. आता खरं काय ते लवकरच कळेलच.