Join us  

Pushpa Unknown Facts: 300 गाड्या, 1500 लोक, 'पुष्पा'च्या शूटिंगसंबंधी या 8 गोष्टी वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:59 PM

'पुष्पा: द राइज'ने 300 कोटीं (Pushpa Box Office Collection)हून अधिक कमाई केली. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या अपोझिट रश्मीका मंदाना दिसली.

अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा: द राइज'(Pushpa: The Rise)  हा चित्रपट कोरोनाच्या काळात प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.. दक्षिण असो वा उत्तर, देशाच्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट आवडला. प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनंतर तो ओटीटीवरही प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा: द राइज'ने 300 कोटीं (Pushpa Box Office Collection)हून अधिक कमाई केली. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या अपोझिट रश्मीका मंदाना दिसली होती. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा'ची कथाच नाही तर प्रत्येक गाणे आणि संवाद खूप लोकप्रिय झाले. चला 'पुष्पा: द राइज' शी संबंधित माहित नसलेले (Pushpa Unknown Facts)  किस्से सांगतो. 

1.लाल चंदनच्या तस्करीवर आधारित सिनेमाअल्लू अर्जुनने या चित्रपटात 'पुष्पा' ही व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील टेकड्यांमधील लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट दोन भागात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 'पुष्पा'चे निर्माते वाय रविशंकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'पुष्पा'ची कथा खूप मोठी आहे आणि ती अडीच तासात पूर्ण सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत तो चित्रपट दोन भागात प्रदर्शित करायचा, असे दिग्दर्शक आणि कलाकारांना वाटले. 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाली असून 10 टक्के कामही पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

2. पुष्पाचा दुसरा भाग येणार'पुष्पा' चित्रपटाचे 80 टक्के शूटिंग पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग बनवण्याचा विचार केला. या कथेने निर्मात्यांना 'बाहुबली'सारखे दोन भाग बनवण्यास भाग पाडले. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की कोरोना कमी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाचे काम लवकरच सुरू केले जाईल.

3. दररोज 300 गाड्यांचा वापर'पुष्पा'चे बहुतांश शूटिंग आंध्र प्रदेशातील मारेदुमिली जंगलात झाले आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला जंगलात नेण्यात आले. टीमला जंगलात नेण्यासाठी निर्माते दररोज 300 वाहने वापरत असत. पहिल्या सीनमध्ये चंदनाचे मोठे बंडल दाखवण्यात आले असून जास्त गर्दी हवी आहे, या एका सीनसाठी 1500 लोक जमले होते. 'पुष्पा' चित्रपटासाठी दररोज 500 लोकांची गरज होती. एका गाण्यासाठी 1000 लोकांना घ्यावे लागायचे. 

4 जंगलात रस्ते बांधावे लागलेकला विभागाच्या मदतीने लाल चंदनाचा कारखाना दाखवला आहे. चंदन तस्करीच्या वाहतुकीच्या दृश्यांचे चित्रीकरण करण्यात निर्मात्यांना खूप अडचणी येत होत्या. याला कारण होते जंगलातील खराब रस्ते. अशा परिस्थितीत प्रवास सुरळीत व्हावा म्हणून टीमने अनेक ठिकाणी कच्चा रस्ते केले होते.

5. पोलिसांनी खरे चंदन समजून अडवलेकेरळच्या जंगलात काही दिवस शूटिंगही झाले. त्यासाठी चंदनाचे कृत्रिम बंडल घेऊन टीम केरळच्या जंगलात गेली. तेथून पथक परतत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. टीमने स्पष्ट केले की ते शूटसाठी कृत्रिम चंदन वापरत होते.

6. अल्लू अर्जुनला पुष्पाचा मेकअप करण्यासाठी दोन तास लागायचेअल्लू अर्जुनला 'पुष्पा' बनवायला अनेक तास लागायचे. अल्लू अर्जुनला मेकअप करायला दोन तास लागायचे. त्यानंतर मेकअप काढण्यासाठी अभिनेत्याला बराच वेळ वाट पाहावी लागली.

7. पोलंडचे सिनेमॅटोग्राफरकोणत्याही चित्रपटात सिनेमॅटोग्राफरची भूमिका महत्त्वाची असते. तो चित्रपटातील दृश्यांना जिवंत करतो. अशा स्थितीत 'पुष्पा'चे प्रत्येक दृश्य प्रेक्षणीय बनवणारे सिनेमॅटोग्राफर मिरोस्ला कुबा ब्रोजेक(Mirosla Kuba Brojek) . ब्रोजेकने पोलंडमधून सिनेमॅटोग्राफरचे प्रशिक्षण घेतले आहे आणि तो बराच काळ दक्षिणेतील चित्रपटांसाठी काम करत आहे.

8. 'पुष्पा'च्या टीझरने बनवला रेकॉर्ड 'पुष्पा' चित्रपटाची पहिली झलक एप्रिल 2021 मध्ये पाहायला मिळाली. चित्रपटाच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुनने दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. निर्मात्यांच्या मते, पुष्पाचा टीझर टॉलिवूडमध्ये 1.5 मिलियन लाईक्ससह सर्वात जास्त आवडलेला टीझर आहे.

 

टॅग्स :अल्लू अर्जुनरश्मिका मंदानाTollywood