‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटामुळे चर्चेत असलेली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. मग काय? तिला पाहून पापाराझींचे कॅमेरे पुढे सरसावले. रश्मिकाचे एक ना अनेक फोटो, व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालेत आणि पाठोपाठ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यानंतर काय झालं तर या व्हिडीओमुळे लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली.
होय, रश्मिकाचे कपडे पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं. मुंबई एअरपोर्टवर रश्मिका व्हाईट कलरची हुडी व शॉर्ट्स आणि डोक्यावर कॅप अशा अवतारात दिसली. अनेकांना तिचा हा लूक कूल वाटला. पण अनेकांना रश्मिकाचा फॅशन सेन्स पाहून नाकं मुरडली.
मॅम,पँट घालायला विसरल्या का? असा सवाल काही युजर्सनी केला. इतके छोटे कपडे घालून मिरवतात, यांना थंडी वाजत नाही का? अशी कमेंट अन्य एका युजरने केली.
रश्मिका मंदाना सध्या ‘पुष्पा’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुन व रश्मिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. रश्मिका साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. रिपोर्टनुसार, रश्मिका 30 कोटी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. बेंगळुरूमध्ये तिचा 8 कोटींचा व्हिला आहे. अलिशान गाड्या आहेत.रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रटातही ती दिसणार आहे.