Join us  

VIDEO: श्रेयस तळपदेचा एअरपोर्टवरचा ‘हा’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, फायर है भाई तू...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 2:20 PM

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे जेव्हा पुष्पातील डायलॉग म्हणतो... पाहा व्हिडीओ

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा  (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa: The rise) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून त्याचीच चर्चा आहे. मग ते  ‘पुष्पा’तील गाणी असोत की डायलॉग... सगळ्यांनीच सोशल मीडियावर हवा केलीय.  ‘पुष्पा’ हा मूळ तामिळ-तेलगू सिनेमा. पण हिंदीतही तो रिलीज झाला. या हिंदी व्हर्जननेही धूम केली. हिंदीत सिनेमा डब करायचा म्हटलं की, मेकर्स अनेकदा व्हॉईसओव्हर आर्टिस्टची मदत घेतात. पण  ‘पुष्पा’च्या मेकर्सनी अल्लू अर्जुनच्या आवाजासाठी बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) निवडलं. सिनेमात अल्लू अर्जुनला श्रेयसने आवाज दिला आहे. अलीकडे श्रेयसने याचा लाईव्ह पुरावाच दिला.

 एअरपोर्टवर श्रेयसने ‘पुष्पा’चा एक गाजलेला डायलॉग ऐकवला. सध्या एअरपोर्टवरचा त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओनं जणू आग लावली आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रेयस तळपदेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टवरील आहे. व्हिडीओमध्ये श्रेयस तळपदे पुष्पाचा लोकप्रिय ठरलेला डायलॉग ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है  मै’ बोलताना दिसत आहे. तो डायलॉग ऐकून फोटोग्राफर देखील श्रेयसची वाह वाह करत असल्याचे ऐकू येत आहे.

श्रेयसच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुपर भाई, फायर है भाई, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.अल्लू अर्जुनच्या बहुतेक चित्रपटांच्या हिंदी डबिंगला व्हॉईसओव्हर आर्टिस्ट संकेत म्हात्रेने आवाज दिला आहे. पण ‘पुष्पा’साठी मात्र श्रेयस तळपदे अल्लू अर्जुनचा आवाज बनला आहे. श्रेयसचा आवाज इतका चपखल बसला आहे की, खुद्द अल्लू अर्जुननेही यासाठी श्रेयसचे जाहिर आभार मानले आहेत.

टॅग्स :श्रेयस तळपदेअल्लू अर्जुनबॉलिवूडTollywood