Join us

फूल नहीं, फायर हूं मैं... म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनची पत्नीही आहे ‘फायर’, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 13:25 IST

Allu arjun Goa Vacation : अल्लूच्या ‘पुष्पा’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशात अल्लू व त्याच्या फॅमिलीचे काही फोटो व व्हिडीओही व्हायरल होत आहेत. यात अल्लू गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतोय.

‘पुष्पा... फूल नहीं, फायर हूं मैं...,’ हा डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त पुष्पा आणि अल्लू अर्जुनची (Allu Arjun) चर्चा आहे. अल्लूच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अशात अल्लू व त्याच्या फॅमिलीचे काही फोटो व व्हिडीओही व्हायरल होत आहेत. यात अल्लू गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतोय.अल्लू व त्याचं कुटुंब नुकतंच गोव्यावरून परतलं. पण अल्लूची पत्नी अल्लू स्रेहा रेड्डी  (Allu arjun Wife Sneha Reddy) हिनं आत्ताकुठे गोवा व्हॅकेशनचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यात स्रेहा पती व मित्रांसोबत पोज देताना दिसतेय.

अल्लू अर्जुन इतकीच त्याची वाईफ स्रेहा सुद्धा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 6.9 मिलिअन फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर ती मुलांसोबतचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.6 मार्च 2016 रोजी अल्लू अर्जुन व स्रेहा यांचं लग्न झालं होतं. दोघांना अल्लू अयान व अल्लू अरहा नावाची दोन मुलं आहेत. अल्लू अर्जुनची पत्नी स्रेहा दिसायला प्रचंड सुंदर आहे. अमेरिकेत तिनं कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. स्नेहाचे वडील हैदराबादेतील एक मोठे बिझनेसमॅन आहेत. अल्लू व स्रेहाची भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती. स्रेहाला पाहताच अल्लू तिच्या प्रेमात पडला होता.

अल्लू अर्जुनने ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘आर्या’ या सिनेमानं. अल्लूला दोन सख्खे भाऊ आहेत. एकाचे नाव आहे व्यंकटेश तर दुसºयाचं नाव आहे शिरीष. व्यंकटेश हा बिझनेसमॅन आहे तर शिरीष हा अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.प्रसिध्द साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी हे अल्लू अर्जुनचे रिलेटिव्ह आहेत. तर रामचरण, वरूण तेज, साई तेज, निहारिका कोनिडेला हे कलाकारदेखील अल्लू अर्जुनचे रिलेटिव्ह आहेत.

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood