अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) ‘पुष्पा’ (Pushpa: the rise) हा सिनेमा रिलीज होऊन दीड महिना झाला, पण अद्यापही सिनेमाच्या चर्चा थांबायचं नाव नाही. सिनेमा तर सुपरडुपर हिट झालाच, पण सिनेमाची गाणी, डायलॉग्सही गाजलेत. अल्लू व रश्मिकाच्या ‘श्रीवल्ली’ (Srivalli Telugu) या गाण्यानं तर वेड लावलं. जगभरात हे गाणं लोकप्रिय झालं. सोशल मीडियावर यावरचे लाखो रिल्स बनलेत. पण हे ओरिजनल गाणं कोणी गायलं? याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. होय, या तेलगू गाण्याला आवाज दिलाय तो गायक सिद्धार्थ श्रीराम उर्फ सिड श्रीराम (Sid Sriram) याने.
अलीकडे अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सिड श्रीराम एका इव्हेंटमध्ये ‘श्रीवल्ली’चं तेलगू व्हर्जन गाताना दिसतोय.
या व्हिडीओची खास बात म्हणजे, तेलगू गायकाचं हे गाणं बॅकग्राऊंड म्युझिकशिवाय ऐकणं एक वेगळा अनुभव आहे. तेलगूतील शब्दांचा अर्थ कळत नसला तरी सिड श्रीरामचा आवाज मंत्रमुग्ध करतो.लाईव्ह इव्हेंटमध्ये सिडचं गाणं ऐकून अल्लू अर्जुन आणि रश्मिकाही भारावलेले दिसत आहेत.
सिडचा हा व्हिडीओ शेअर करत अल्लू अर्जुनने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने सिडचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘मी यावर निवांतपणे लिहू इच्छित होतो़ कुठल्याही बॅकग्राऊंड म्युझिकशिवाय गायकाच्या लाईव्ह परफॉर्मन्सने सर्वांची मनं जिंकून घेतली़ माझा भाऊ सिडश्रीराम गारू प्री-रिलीज इव्हेंटमध्ये श्रीवल्ली गात होता. त्याने म्युझिकशिवाय गाणं सुरू केलं. मी म्युझिक सुरू होण्याची वाट पाहत होतो आणि तो म्युझिकशिवाय गात गेला. त्याच्या आवाजात जादू होती. त्याचा आवाज इतका जादुई होता की, त्याला कोणत्याही वाद्यवृंदाची गरज नव्हती. तो स्वत:च एक संगीत आहे,’असं अल्लू अर्जुनने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोबत गाण्याची क्लिपही शेअर केली आहे.