Join us

पुष्पा स्टार Allu Arjunने थाटात साजरा केला लेकाचा बर्थ डे, पाहा सेलिब्रेशनचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:42 IST

मुलाच्या वाढदिवसाची अल्लू अर्जुनने घरी एक ग्रँड पार्टी दिली, ज्याचे आतील फोटो समोर आले आहेत.

'पुष्पा' (Pushpa)  स्टार अल्लू अर्जुन  (Allu Arjun) आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) यांचा मुलगा अल्लू अयान  (Allu Ayaan) 8 वर्षांचा झाला आहे. मुलाच्या वाढदिवसाची अल्लू अर्जुनने घरी एक ग्रँड पार्टी दिली, ज्याचे आतील फोटो समोर आले आहेत. यामध्ये कलाकार संपूर्ण कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहेत. त्याने आपल्या मुलासोबतचा एक क्युट फोटोही सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो स्नेहा रेड्डीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यात तिने केकचा फोटोही शेअर केला आहे,  केक कटिंग करतानाचा ही  फोटो समोर आले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुन आणि स्नेहासोबत अयानची बहीण अल्लू अरहा आपल्या मैत्रमैत्रिणींसोबत दिसत आहेत. 

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांनी मार्च 2011 मध्ये लग्न केले होते. यानंतर मुलगा अयानचा जन्म ३ एप्रिल २०१४ रोजी झाला. यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी अरहा आली.

अल्लू अर्जुननेही एक फोटो शेअर करत मुलगा अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अयान 'विंग मॅन'ची टोपी घातलेला दिसत आहे. अल्लू अर्जुनने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या मुलाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात सदैव आनंद येवो.

कामाच्या आघाडीवर, अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा' चित्रपटात दिसला होता, जो ब्लॉकबस्टर होता. आता तो त्याचा दुसरा भाग रिलीज होण्याची वाट पाहत आहे, जो या वर्षी डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल.  

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodपुष्पा