Join us  

अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 9:31 AM

Pushpa Movie : अल्लू अर्जुन हा साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आहे. ज्याने 'पुष्पा' चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि डॅशिंग ॲक्शनने लोकांची मने जिंकली. पण त्याच्या आधी हा चित्रपट बॉलिवूडचा एक सुपरस्टार करणार होता.

अल्लू अर्जुन हा साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आहे. ज्याने 'पुष्पा' चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि डॅशिंग ॲक्शनने लोकांची मने जिंकली. पण त्याच्या आधी हा चित्रपट बॉलिवूडचा एक सुपरस्टार करणार होता. होय, हा चित्रपट बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानला ऑफर करण्यात आला होता. मात्र अभिनेत्याने हा चित्रपट नाकारला. 

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने अल्लू अर्जुनला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अल्लूने आपली व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच आजही अभिनेत्याची ही भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि ते 'पुष्पा २' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरेतर, 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुन नाही तर बॉलिवूडचा किंग ऑफ रोमान्स म्हणजेच शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार होता. याचा उल्लेख खुद्द शाहरुख खानने IIFA २०२४ च्या मंचावर केला होता. 

सिनेमा नाकारण्याचे कारण आले समोर

विक्की कौशलने शाहरुखला विचारले की, 'पुष्पा' सिनेमाची त्याला आधी ऑफर आली होती का? तर तो म्हणाला, 'अरे यार, तू माझ्या वेदनादायक नाडीवर हात ठेवलास. मला खरंच पुष्पा करायचा होता. शाहरुख खानने चित्रपट नाकारण्याचे कारण सांगितले. तो अल्लू अर्जुनच्या स्वॅगशी जुळवू शकत नाही. त्यामुळेच त्याने हा चित्रपट केला नाही, असे किंग खानने म्हटले.

'पुष्पा'बद्दल

रश्मिका मंदाना 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनसोबत दिसली होती. या दोघांनी मोठ्या पडद्यावर खळबळ माजवली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. वृत्तानुसार, १८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३६०-३७३ कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले होते. लवकरच या चित्रपटाचा भाग २ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट यावर्षी ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

 

टॅग्स :अल्लू अर्जुनशाहरुख खान