‘क्वांटिको3’मध्ये भारतीयांना दाखवले अतिरेकी! ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रावर निघाला लोकांचा राग!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 12:27 PM
‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्राच्या रिलेशनशिपच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. पण याच चर्चेदरम्यान ‘क्वांटिको गर्ल’बद्दलची आणखी एक बातमी जोरात आहे. ...
‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्राच्या रिलेशनशिपच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. पण याच चर्चेदरम्यान ‘क्वांटिको गर्ल’बद्दलची आणखी एक बातमी जोरात आहे. होय, काही दिवसांपूर्वी ‘क्वांटिको3’ टीआरपी घसरल्यामुळे बंद करावा लागला होता आणि आता त्याच्या टेलिकास्ट झालेल्या शेवटच्या भागामुळे प्रियांका टीकेची धनी ठरली आहे. या एपिसोडमुळे प्रियांका युजर्सच्या निशान्यावर आली आहे. आता या शेवटच्या सीनमध्ये असे काय होते, असा प्रश्न तुम्हाला पडले असेल. तर ‘क्वांटिको3’च्या टेलिकास्ट झालेल्या या अखेरच्या एपिसोडमध्ये भारतीयांना दहशतवादी दाखवण्यात आले आहे. काही भारतीय मॅनहटनमध्ये बॉम्ब पेरतात. पण याचा सगळा आरोप पाकिस्तानवर यावा, अशी योजना करतात. हा एपिसोड आॅन एअर होताच लोकांच्या संतापाचा भडका उडाला. भारतीयांना दहशतवादी दाखवल्याने भारताच्या प्रतिमेवर त्याचा वाईट प्रभाव पडू शकतो, असे लोकांचे म्हणणे आहे. मग काय, या मुद्यावरून लोकांनी या शोचा भाग असलेल्या प्रियांकालाही लक्ष्य केले. भारतीय लोक केवळ प्रियांका असल्यामुळे ‘क्वांटिको’ सीरिज बघतात. पण यात चक्क भारतीयांनाच अतिरेकी ठरवण्यात आल्याने लोकांचा राग अनावर झाला. एका युजरने तर प्रियांका व ‘क्वांटिको’ सर्वांचीच लाज काढली. ‘प्रियांका व क्वांटिकोचे मेकर्स दोघांनाही लाज वाटायला हवी. भारतीयांना अशाप्रकारे अतिरेकी दाखवणे गैर आहे,’ असे या युजरने म्हटले. अन्य एका युजरने ‘क्वांटिको3मध्ये हा सीन दाखवणे त्रासदायक आहे,’अशा शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली तर एका युजरने थेट प्रियांकाला लक्ष्य केले. ‘आता कळले की, प्रियांका रोहिंग्या मुस्लिमांची बाजू का घेत होती,’असे त्याने लिहिले. ALSO READ : प्रियांका चोप्रा अन् निक जोनसमध्ये फुलतेय प्रेम; हा घ्या पुरावा!‘क्वांटिको’चे तिसरे सीझन केवळ १३ एपिसोडचे आहे. शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाल्याने आता हे प्रकरण समोर कुठले वळण घेते, ते येता काळचं सांगणार आहे. तूर्तास प्रियांकाच्या डेटींगच्या बातम्या जोरात आहेत. प्रियांका अमेरिकन सिंगर व अभिनेता निक जोनासला डेट करत असल्याचे मानले जात आहे.