Join us

धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:11 IST

या अभिनेत्रीने आमिर खानसोबत काम केले होते. या चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार बनवले होते.

आमिर खान(Aamir Khan)च्या 'दंगल' (Dangal Movie) सिनेमातून करिअरची सुरूवात करणारी जायरा वसीमला कोणत्याही परिचयाची गरज नाही. जायराला डेब्यू सिनेमातूनच चांगली लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातून तिने छोट्या गीता फोगाटच्या भूमिकेत झळकली होती. एका रात्रीत स्टार झालेली जायरा आता कलाविश्वातून गायब आहे. तिने धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीतून संन्यास घेतला आहे. 

जायरा वसीमचा जन्म २३ ऑक्टोबर, २००० मध्ये झाला होता. ती काश्मीरी मुस्लीम कुटुंबाशी संबंधीत आहे. तिचे वडील बॅंकेत काम करत होते. तिची आई शिक्षिका आहे. जायराच्या वडिलांचे निधन झाले आहे. याबाबत तिनेच सांगितले होते. जायराने २०१६ साली दंगलमधून पदार्पण केले होते. त्यानंतर ती २०१७ साली आमिर खानचा चित्रपट सीक्रेट सुपरस्टारमध्ये झळकली होती. २०१९मध्ये द स्काय इज पिंकमध्येही काम केले होते. जायराने तिच्या सिनेकारकीर्दीत तीनच चित्रपट केले आहेत. मात्र तिन्ही सिनेमातून लोकप्रियता मिळाली होती.

धर्माचे कारण सांगत कलाविश्वाला केला रामराम

जायराने २०१९मध्ये सिनेइंडस्ट्रीतून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर केली होती. जायराने लिहिले होते की, मला प्रेम दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा दिल्याबद्दल मी आभारी आहे. ५ वर्षांपूर्वी मी जेव्हा बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता ज्यामुळे माझे पूर्णपणे आयुष्य बदलून गेले होते. मला जास्त लोकप्रियता मिळाली. लोकांच्या नजरेत राहू लागले आहे. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की, मला जी ओळख मिळाली आहे, त्यात मी खूश नाही.

सोशल मीडियावर आहे सक्रीयजायराने धर्माचे कारण सांगून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. जायरा वसीमने सोशल मीडियावरून फोटो काढून टाकले आहेत. तिने इंडस्ट्री सोडल्याच्या दोन वर्षांनंतर एक फोटो शेअर केला होता, ज्यात तिचा चेहरादेखील दिसत नाही. ती बुरख्यात दिसत आहे. आता जायरा इंस्टाग्रामवर सक्रीय आहे. ती मोटिवेशनल कोट्स शेअर करत असते. 

टॅग्स :झायरा वसीमआमिर खान