Join us

आलिया - रणबीरपेक्षा उत्तम कलाकार शोधून दाखवा मग बोलू... ! दिग्दर्शक आर. बल्की यांचे असेही आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:54 AM

नेपोटिजमच्या वादात दिग्दर्शक आर. बल्की यांची उडी

ठळक मुद्देघराणेशाही या विषयावर चर्चा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे,’ असे ते म्हणाले.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमच्या मुद्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. करण जोहर, आलिया भट, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा असे अनेक स्टार्स सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. आता या वादात दिग्दर्शक आर. बल्की यांनी उडी घेतली आहे.  एका ताज्या मुलाखतीत ते नेपोटिजमच्या मुद्यावर बोलले. अनेक लोक केवळ मनोरंजनासाठी नेपोटिजमवर चर्चा करत आहेत, असे बल्की म्हणाले. केवळ इतकेच नाही तर नेपोटिजम कुठे नाही? असा सवालही त्यांनी केला.

‘नेपोटिजम, घराणेशाही केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर सर्वत्र आहे. नेपोटिजम प्रत्येक समाजाच्या वर्गात पाहायला मिळतो. व्यापारी आपला व्यापार आपल्या मुलांना सोपवतो. साधा ड्रायव्हर वा भाजीपाला विक्रेता असेल तर तोही आपला बिझनेस मुलांकडे सोपवतो. असे असताना घराणेशाही या विषयावर चर्चा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे,’ असे ते म्हणाले.

बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बोलताना ते म्हणाले,‘बॉलिवूड स्टार्सबद्दल नेपोटिजम हा शब्द वापरणे मी चूक समजतो. स्टार किड्स असण्याचा खरच मोठा फायदा मिळतो का?   तर मी म्हणेल हो. मात्र जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत. मला तुम्हा सर्वांना एक साधा सरळ प्रश्न विचारायचा आहे. अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या पेक्षा चांगले कलाकार मला शोधून दाखवला आणि मग आपण यावर बोलू. असे बोलून आपण त्यांच्यासारख्या अतिशय चांगल्या कलाकारांवर अन्याय करत आहोत. आलिया भटच्या अभिनयाचे कौतुक करण्याऐवजी लोक तिला एका चित्रपट निर्मात्यांची मुलगी आहे म्हणून ट्रोल करत आहेत. प्रेक्षकांना स्टार किड्स पडद्यावर पाहणे आवडते. स्टारकिड्सला पहिली संधी मिळते. पण यानंतर त्यांना केवळ त्यांच्या कामाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करावे लागते. बाहेरच्या व्यक्तिला इंडस्ट्रीत प्रवेश मिळणे कठीण आहे, हे मी मान्य करतो. पण ख-या प्रतिभेला संधी मिळतेच, हेही मी दाव्यानिशी सांगू शकतो.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर