Join us

विद्यार्थीनीवर झाला होता लट्टू, अशी आहे आर. माधवनची प्रेमकथा, करतो पत्नीवर प्रचंड प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 6:00 AM

माधवन अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत असला तरी त्याचे कधीच कोणत्या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं नाही. तो सरितावर प्रचंड प्रेम करतो.

ठळक मुद्देआर. माधवन आणि सरिताने जवळपास 8 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केले.

अभिनेता आर. माधवनचा जन्म 1 जून, 1970 साली जमशेदपूर येथे झाला आहे. त्याचा आज वाढदिवस असून बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. माधवनची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तो त्याच्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात लट्टू झाला होता. ती आज त्याची पत्नी आहे.आर. माधवन आणि त्याची बायको सरिताची लव्हस्टोरी इतरांपेक्षा थोडीशी हटके आणि इंटरेस्टिंग आहे. माधवनचे वडील टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्यूटिव्ह होते तर आई बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. अभ्यासात हुशार असलेल्या माधवनने त्यासोबत अनेक छंदही जोपासले होते. त्याला आर्मीमध्ये प्रवेश घ्यायचा होता मात्र त्याच्या पालकांनी त्याला मॅनेजमेंट स्टीडी करण्याचे सुचवले. इलेक्ट्रॉनिकची डिग्री घेतल्यानंतर माधवनने कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पिकिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. याच क्लासमध्ये माधवन आणि सरिताची भेट झाली.

1991मध्ये सरिता एअरहोस्टेसच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होती. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लाससाठी ती त्यावेळी महाराष्ट्रात आली होती. तिचा कोर्स संपल्यानंतर तिने माधवनचे आभार मानले आणि सोबतच त्याला डिनरसाठी आमंत्रित केले.

आपल्या पहिल्या डेटबद्दल माधवन सांगतो, 'सरिता माझी स्टुडंट होती आणि तिने मला डिनर डेटसाठी विचारलं. माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी तिला त्याचवेळी प्रपोज केले आणि नंतर तिच्याशी लग्न केले.'

आर. माधवन आणि सरिताने जवळपास 8 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न तमीळ पद्धतीने झाले. त्यांच्या मुलाचे नाव वेदांत आहे. माधवन अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत असला तरी त्याचे कधीच कोणत्या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं नाही. तो सरितावर प्रचंड प्रेम करतो. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याला तिला त्याच्यासोबत पाहायला मिळतं. 

टॅग्स :आर.माधवन