Join us  

क्लिन शेव्ह करुन माधवनचं आईसाठी खास गिफ्ट, नवा लूक पाहून लोकांना आली RHTDM ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:55 PM

आर. माधवनने आईच्या आग्रहाला मान देऊन त्याच्या क्लीन शेव्ह लूकमध्ये परत आलाय (r madhavan)

आर. माधवन हा भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. माधवनला आपण 'गुरु', 'तनू वेड्स मनू', '3 इडियट्स', 'रॉकेट्री' अशा विविध बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. माधवनची दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही चांगलीच क्रेझ आहे. माधवनला अलीकडेच आपण अजय देवगणसोबत 'शैतान' सिनेमात पाहिलं. माधवन एका खास गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आलाय. ती म्हणजे माधवनने आईची इच्छा होती म्हणून क्लीन शेव्ह केलंय. त्याच्या आईने याविषयी खास पोस्ट शेअर केलीय.

आईची इच्छा म्हणून माधवनने केली क्लीन शेव्ह!

आर.माधवनची आई सरोज रंगनाथन यांनी स्वतःचं इन्टाग्राम अकाऊंट उघडलं. अकाऊंट उघडतानाच त्यांनी आपल्या लेकासोबतचा खास फोटो शेअर करत पहिली पोस्ट केली. या फोटोखाली त्या कॅप्शन लिहितात, "जेव्हा माझा मुलगा क्लीन शेव्ह करतो तेव्हा मला खूप छान वाटतं. सातत्याने पांढरी दाढी वाढवणाऱ्या माधवनने क्लीन शेव्ह केल्यावर मी त्याच्यासोबत हा फोटो काढला. बरोबर ना माधवन?" माधवनचा हा नवीन लूक पाहून अनेकांनी त्याला पसंती दिली आहे. लोकांनी माधवन आणि त्याच्या आईच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

माधवनचा लूक पाहून लोकांना आली RHTDM ची आठवण

आर. माधवनचा हा लूक पाहून लोकांनी कमेंट करुन त्याच्या RHTDM अर्थात 'रेहना है तेरे दिल में' सिनेमाची आठवण जागवली आहे. एका युजरने कमेंट केलीय की, 'सर RHTDM मधला मॅडीचा सिगरेट हातात घेऊन लूक पुन्हा रिक्रिएट करा प्लीज.' आणखी एकाने कमेंट केलीय की, 'एका क्षणी मला वाटलं की मी RHTDM मधील माधवनला पाहतोय की काय', दुसऱ्या एका युजरने कमेंट केलीय की, 'आपण परत 90's मध्ये गेलाय. वय वाढलं तरी माधवन अजून आहे तसाच आहे.' आणखी एका युजरने कमेंट केलीय की, 'वयाच्या पन्नााशीत एखादा माणूस विशीतला कसा वाटू शकतो', अशा भन्नाट कमेंट करत लोकांनी माधवनच्या लूकला पसंती दिली आहे.

टॅग्स :आर.माधवनबॉलिवूडअजय देवगण