आर माधवन हा सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'हिसाब बराबर' या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आर माधवनबरोबर किर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात आर माधवन भष्ट्राचाराच्या विरोधात लढताना दिसणार आहे.
'हिसाब बराबर' हा सिनेमा एक सोशल ड्रामा आहे. या सिनेमात आर माधवन रेल्वे टीसी(तिकीट तपासणीस) भूमिका साकारताना दिसणार आहे. एक सामान्य आयुष्य जगणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील भष्ट्राचारविरोधात लढणारी व्यक्ती अशी त्याची भूमिका आहे. कॉर्पोरेट बँकांमधील घोटाळा तो उघड करणार आहे. 'हिसाब बराबर' या सिनेमात आर माधवन साकारत असलेल्या भूमिकेचं नाव राधे मोहन असं आहे. तर अभिनेता नील नितीन मुकेश सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत आहे. या सिनेमात तो मिकी मेहता या एका पावरफूल बँकरची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आर माधवनचा हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २४ जानेवारीला हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. अश्विनी धीर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आर माधवन, किर्ती कुल्हारी, नील नितीन मुकेश यांच्यासह अनिल पांडे, महेंद्र राजपूर, फैजल राशिद, रश्मी देसाई यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत