Join us  

Ajay-R Madhavan: अजय देवगणच्या सिनेमात आर माधवनची धमाकेदार एंट्री, पहिल्यांदाच एकत्र शेअर करणार स्क्रिन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 4:40 PM

बॉलिवूड सिंघम अजय देवगणसोबत पहिल्यांदाच आर, माधवन स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

'दृश्यम 2' आणि 'भोला' नंतर अजय देवगणने आता त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'दृश्यम 2' च्या जबरदस्त यशानंतर अभिनेता अजय देवगणने पुन्हा एकदा या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हा एक सुपरनॅचरल थ्रिलर ड्रामा चित्रपट असेल. यासोबतच या चित्रपटाबाबत एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे. अजय देवगणच्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निर्मात्यांनी माहिती दिली आहे की, यात आर माधवन देखील दिसणार आहे.

अजय देवगणच्या चित्रपटात माधवनची एंट्रीआर माधवन एक जबरदस्त अभिनेता आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या रॉकेट्री - द नंबी इफेक्ट या चित्रपट रिलीज झाला आहे. यानंतर आता आर माधवनने या हॉरर-थ्रिलर चित्रपटात बॉलिवूड सिंघम अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अजय आणि माधवन गुजराती चित्रपट 'वश'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहेत.

अजय देवगणच्या या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांच्यासोबत या चित्रपटाची सहनिर्मिती अजय देवगण करणार आहेत. सध्या अभिनयासोबतच  अजय देवगण चित्रपट निर्मितीच्या इतर क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित करत आहे. भोला या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती दोनही अजय देवगणनं  केलं होतंं. 

अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, 'दृश्यम 2' आणि 'भोला' नंतर, त्याचा 'मैदान' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. याशिवाय फिल्मस्टार रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटाचे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. यासोबतच अजय देवगणआर माधवन  या चित्रपटाचे शूटिंग जून 2023 पासून सुरू करणार आहे.  या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, मसुरी आणि लंडनमध्ये होणार आहे. 

टॅग्स :अजय देवगणआर.माधवन