Join us

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक; म्हणाला - हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो- हसवतो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 7:59 PM

'द व्हॅक्सिन वॉर'ची कथा कोरोना महामारीच्या काळावर आधारलेली आहे.

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यातच अभिनेता आर माधवनने नुकताच हा चित्रपट पाहिला आणि चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. 

Just saw “THE VACCINE WAR” and totally blown out of my mind by the spectacular sacrifices and achievements of the Indian scientific community, which made India’s very first vaccine and kept the nation safe during the most challenging period, told by a Master Storyteller who… pic.twitter.com/eeWqTO3QJQ— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) August 28, 2023

 

आर माधवनने ट्वीट करत लिहिलं, “मी ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट पाहिला.  भारतातील पहिली करोना व्हॅक्सिन बनवून अत्यंत आव्हानात्मक काळात देशाला सुरक्षित ठेवलं. या वैज्ञानिकांचा अतुलनीय त्याग आणि यशाने माझं डोकं सुन्न झालं आहे. हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो, हसवतो आणि टाळ्या वाजवण्यास भाग पाडतो. सर्व अभिनेत्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून भारतीय महिला शास्त्रज्ञांचा त्याग आणि धैर्य यांचं योग्य आणि प्रभावशाली चित्रण खूप सुंदर केलं आहे. तुम्ही आत्ताच #TheVaccineWar ची तिकिटं बुक करा आणि लॉकडाऊनमध्ये तुम्हाला मदत करणाऱ्या तुमच्या सुपरवुमनसाठीही तिकिटे घ्या. मग त्या तुमच्या घरातील डोमेस्टिक हेल्पर असोत किंवा घरातील महिला असोत.”

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी अमेरिकेत चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. या चित्रपटात नाना पाटेकर, अनुपम खेर, रायमा सेन आणि पल्लवी जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'द व्हॅक्सिन वॉर'ची कथा कोरोना महामारीच्या काळावर आधारलेली आहे. या चित्रपटातून जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलघडली जाणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडआर.माधवनसिनेमाविवेक रंजन अग्निहोत्री