Join us

कंगनासाठी धावून आला आर माधवन! तनूचं बुडतं करिअर वाचवणार? पोस्ट पाहून चाहते खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 5:51 PM

बॅक टू बॅक फ्लॉपनंतर कंगनाने तिचा हुकमाचा एक्काही काढला असल्याचं दिसतंय.

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचे (Kangana Ranaut) गेले काही चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत. 'पंगा','धाकड','तेजस', 'मणिकर्णिका' असे अनेक सिनेमे बॅक टू बॅक आपटले. 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' नंतर तिचा एकही लक्षात राहण्यासारखा सिनेमा नाही. आता तिला आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाकडून जास्त अपेक्षा आहेत. शिवाय कंगनाने तिचा हुकमाचा एक्काही काढला असल्याचं दिसतंय. कंगना आणि आर माधवन (R Madhavan) ही सुपरहिट जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. कंगनाने तिच्या पोस्टमधून माधवनसोबत काम करत असल्याची हिंट दिली आहे.

कंगना आणि आर माधवन यांचा 'तनू वेड्स मनू' आणि 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आजही हे चित्रपट कधीही लागले तरी आवडीने पाहिले जातात. दोघांची केमिस्ट्रीही जबरदस्त आहे. आता कंगनाच्या बुडत्या करिअरला वाचवण्यासाठी आर माधवन आल्याचं दिसतंय. कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, ' एका दमदार स्क्रीप्टसह मी माझा आवडता अभिनेता माधवनसोबत परत येत आहे.' तसंच कंगनाने आणखी एक फोटो शेअर करत 'मस्त टीम' असंही लिहिलं आहे. याचाच अर्थ आर माधवनसोबतच्या तिच्या आगामी सिनेमावर काम सुरु झालं आहे.

ही बातमी पाहून चाहते तर खूश झालेत. पुन्हा ही जोडी काय धमाल करणार हे पाहण्यासाठी चाहते  उत्सुक आहेत. तर कंगनाच्या ट्रोलर्सने लिहिले, 'कंगना आात माधवनचं करिअर खराब करणार.',' प्लीज माधवन कंगनापासून दूर राहा, नाहीतर ही तुझंही करिअर खराब करण्यात काहीच कसर सोडणार नाही','चला कोणीतरी हिचा फेवरेट आहे नाहीतर ही प्रत्येकाच्या विरोधात असते.'

कंगनाचा आधी 'इमर्जन्सी' रिलीज होणार आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. यामध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे यांचीही भूमिका आहे.

टॅग्स :कंगना राणौतआर.माधवनबॉलिवूडसिनेमा