संपूर्ण जग ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं तो क्षण आज सर्वांनी अनुभवला. अमेरिकेतील नासाच्या साहसी अंतराळवीर सुनीत विल्यम्स (sunita williams) ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्या. फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर सुनीता स्पेसमधून सुखरुप परत आल्या. त्यामुळे जगभरातील लोकांनी सुनीता विल्यम्स यांचा गौरव केलाय. याशिवाय त्या पृथ्वीवर सुखरुप परत आल्याने आनंद व्यक्त केलाय. सुनीता यांच्याविषयी अभिनेता आर.माधवनने केलेली पोस्ट चर्चेत आहे.आर.माधवनने केलं सुनीता यांचं अभिनंदन"प्रिय सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा या भूमीवर तुझं खूप स्वागत. आमच्या प्रार्थनांना आज यश आलं. तुम्हाला सुरक्षित आणि हसताना पाहून खूप छान वाटतंय. तब्बल २६० हून जास्त दिवस अंतराळात राहून सुरक्षित परत येणं.. करोडो लोकांच्या सदिच्छा आणि देवाच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालंय. तुमच्या संपूर्ण टीम आणि क्रूला माझ्याकडून अभिनंदन." अशा शब्दात अभिनेता आर.माधवनने सुनीता विल्यम्स यांच्याविषयी पोस्ट लिहिली आहे.
सुनीता यांचं पृथ्वीवर सुखरुप आगमनअमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले. हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले. भारतीयांनी याशिवाय जगभरातील वैज्ञानिक, संशोधक आणि सामान्य माणसांनी सुनीता पृथ्वीवर परत आल्याने आनंद व्यक्त केलाय.