Join us

वयाच्या २५ व्या वर्षी या बॉलिवूडच्या अभिनेत्रीला आला होता पॅरालिसिसचा अटॅक, आज अभिनयक्षेत्रापासून दूर असून राहाते लंडनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 3:23 PM

रागेश्वरी ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका होती. तिचे अनेक अल्बम देखील प्रसिद्ध झाले होते. तिचे मेड इन इंडिया हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

गोविंदाच्या आँखे या चित्रपटात रागेश्वरी लुम्बा मुख्य भूमिकेत झळकली होती. तसेच मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटात देखील ती सैफ अली खानच्या नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. रागेश्वरी ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका होती. तिचे अनेक अल्बम देखील प्रसिद्ध झाले होते. तिचे मेड इन इंडिया हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे तिच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. रागेश्वरी ही नव्वदीच्या दशकात खूप फॉर्म मध्ये होती. तिने कोकाकोलासोबत संपूर्ण भारतात कॉन्सर्ट करण्याची एक डिल केली होती. २००० सालची ही घटना असेल. यासोबतच ती आणि तिचे वडील मिळून Y2K हा अल्बम लाँच केला होता. त्यावर देखील तिचे काम सुरू होते. याच अल्बममधील इक्की चिक्की या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. त्याचदरम्यान तिला मलेरिया झाला होता. त्यानंतर ती काहीच दिवसांत बरी होईल असे सगळ्यांना वाटत होते. पण मलेरिया झाल्यानंतर काहीच दिवसांत ती Bell's Palsy नावाच्या आजाराने ग्रस्त झाली आणि याच दरम्यान तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. हा अटॅक इतका जबरदस्त होता की, तिच्या शरीराची डावी बाज अजिबातच हलत नव्हती. पण ती तिच्या जिद्दीच्या जोरावर यातून बाहेर पडली. फिजियोथेरेपीच्या मदतीने तिची डावी बाजू पुन्हा कार्यरत झाली. चित्रपटांप्रमाणेच बार बार देखो तुम, एमटीवी एक दो तीन, वन ऑन वन विथ राग्स, सब गोल माल है यांसारख्या मालिकेत आणि बिग बॉस या रिअॅलिटी शो मध्ये ती झळकली आहे. ती सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असून लंडनमध्ये राहाते. तिचे सुंधाशू स्वरूप या वकिलासोबत २०१४ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर ती लंडनमध्येच स्थायिक झाली. तिला एका मुलगी असून ती आता लंडनमध्ये मोटिव्हेशनल टीचर असून लोकांना योगा शिकवते. रागेश्वरी चित्रपटसृष्टीत काम करत नसली तरी आजही चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या ती आजही संपर्कात आहे.