90 च्या दशकात रागेश्वरी लूंबा सिनेमा आणि संगीताच्या विश्वास चांगली प्रसिद्ध होती. तिने सैफ अली खान आणि सुनील शेट्टीची अभिनेत्री म्हणूनही काम केलं होतं. त्यावेळचे लोक तिच्या गायकीचे आणि सौंदर्याचे फॅन्स होते. बालपणी रागेश्वरी तिच्या मित्रांमध्ये 'राग्ज' नावाने प्रसिद्ध होती. रागेश्वरीचा पहिला सिनेमा 'ऑंखे' होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ती 'मैं खिलाड़ी तू अनाडी' मध्ये अक्षय कुमारची बहीण आणि सैफ अली खानची हिरोईन होती. तिचं क्यूटनेस आणि सौंदर्य सिनेमात पसंत करण्यात आलं होतं. 'आँखे' या चित्रपटात ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसली तेव्हा ती केवळ 16 वर्षांची होती.
'आँखे' हा चित्रपट सुपरहिट होताच रागेश्वरी लुंबाही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होऊ लागली. ती पहिल्याच चित्रपटापासून प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सामील होऊ लागली. यानंतर, 1994 मध्ये त्यांना 'झिद' नावाचा आणखी एक चित्रपट आला, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही.
1994 मध्येच, रागेश्वरी पुन्हा अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या 'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपटात दिसली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला. हा चित्रपट सुपरहिट होताच, पुन्हा एकदा रागेश्वरी लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरली, परंतु हा रागेश्वरीचा शेवटचा हिट चित्रपट होता, कारण यानंतर तिने आणखी तीन चित्रपटांमध्ये काम केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1997 नंतर रागेश्वरीने तिचे करिअर गाण्याकडे केंद्रित केले होते, जेव्हा अभिनेत्रीने चित्रपटांपासून दूर गाण्यात नशीब आजमावले तेव्हा ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होऊ लागली. 1997 ते 2006 पर्यंत रागेश्वरीचे जवळपास 6 अल्बम आले. सर्व काही ठीक चालले होते की अचानक पण एक घटना अशी घडली की, रागेश्वरीच्या अख्खा आयुष्याला कलाटणी मिळाली.
2000 मध्ये तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि रागेश्वरीचे अख्खे आयुष्य बदलले. शरीराचा डावा भाग पूर्णपणे लुळा पडला. तिला बोलताही येईना. अर्थात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द या जोरावर रागेश्वरी या आजारातून बरी झाली.
या आजारातून रागेश्वरी लवकरच बरी होईल असे वाटत असताना काहीच दिवसांत रागेश्वरीला Bell's Palsy या आजाराचे निदान झाले आणि याच दरम्यान तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. हा अटॅक इतका मोठा होता की, रागेश्वरीच्या शरीराच्या डाव्या भागाची हालचाल मंदावली. तिला बोलताही येईना. पण जिद्दीच्या जोरावर रागेश्वरी यातून बाहेर पडली. फिजियोथेरेपीच्या मदतीने तिच्या शरीराची डावी बाजू पुन्हा कार्यरत झाली. या आजारातून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर 2014 मध्ये रागेश्वरीने लग्नाचा निर्णय घेतला. पेशाने वकील असलेल्या सुंधाशू स्वरूप यांच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर लंडनमध्येच स्थायिक झाली.लग्नाच्या चार वर्षानंतर ती आई झाली. ती आता संसारात आनंदी आहे.