Join us

'सॅम बहादूर' मधलं 'रब का बंदा है ये...' गाणं रिलीज, शंकर महादेवनच्या आवाजाने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 14:14 IST

अभिनेता विकी कौशलच्या सॅम बहादुर या चित्रपटामधील  'रब का बंदा है ये...'  हे गाणं रिलीज झालं आहे.

अभिनेता विकी कौशलचा 'सॅम बहादूर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  या चित्रपटात विकी हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.  आता सॅम बहादुर या चित्रपटामधील  'रब का बंदा है ये...'  हे गाणं रिलीज झालं आहे. शंकर महादेवनच्या आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

या गाण्यात सॅम माणेकशॉ यांच्या जीवनाची झलक पाहायला मिळते. 'रब का बंदा है ये...'  हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले आहे. तर  गुलजार यांनी हे गाणं लिहिलं आहे.  या गाण्याचं सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत.याआधी या चित्रपटातील 'बढते चलो' हे गाणं रिलीज झाले होते. हे गाणेही देशातील लोकांमधील उत्साह आणि देशभक्तीची भावना वाढवणारे आहे. 

 विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  एवढेच नाही तर उरी चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही विकी भारतीय लष्कराच्या गणवेशात डॅशिंग दिसत आहे. 1971 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी अवघ्या 13 दिवसांत शत्रूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर या चित्रपटातून मांडण्यात येत आहे. 

 'सॅम बहादूर' चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राने सॅम बहादूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे.  1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये  'सॅम बहादूर' प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूडसेलिब्रिटी