Join us

अनुराग कश्यपच्या सपोर्टसाठी समोर आली राधिका आपटे, म्हणाली - 'तुझ्यासोबत नेहमीच सुरक्षित वाटलं'

By अमित इंगोले | Published: September 21, 2020 11:24 AM

अभिनेत्री राधिका आपटे ही अनुराग कश्यपच्या सपोर्टसाठी समोर आली असून तिने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केलीय.

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप लावले. पायलने दावा केला की, २०१५ मध्ये अनुरागने तिच्यासोबत जबरदस्ती केली होती. इतकेच नाही तर ट्विट करून तिने पंतप्रधानांकडे मदतीची मागणीही केली. तेच अनुरागने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी अनुरागच्या सपोर्टसाठी समोर आले आहेत. यात आता अभिनेत्री राधिका आपटेचं नावही जोडलं गेलंय.

राधिका आपटेने इन्स्टाग्रामवर अनुराग कश्यपसोबतचा हसतानाचा फोटो शेअर केला. तिने लिहिले की, 'अनुराग कश्यप तू माझा सर्वात जवळचा मित्र राहिलाय. तू मला प्रेरणा दिली आहे आणि नेहमी मला साथ दिली. तू मला नेहमीच बरोबरीचा हक्क दिला. आपलं एकमेकांप्रति जे प्रेम आहे, जो सन्मान आहे तो वेगळा आहे. ज्या दिवसापासून मी तुला ओळखते, तेव्हापासून मला स्वत:ला तुझ्यासोबत सुरक्षित जाणवलं आहे. तू नेहमी माझा खरा मित्र राहिलाय आणि राहणार. लव्ह यू'.

तापसी पन्नूने केला सपोर्ट

अनुराग कश्यपवर आऱोप झाल्यावर त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री तापसी पन्नू त्याच्या सपोर्टमध्ये समोर आली आहे. तापसीने सुद्धा अनुरागसोबतचा फोटो शेअर केला. तिने पोस्टमध्ये लिहिले की, 'तू माझा मित्र आणि सर्वात मोठा फेमिनिस्ट आहे. ज्याला मी ओळखते. तुझ्या नव्या आर्ट पीसच्या सेटवर लवकरच भेट होईल. ज्यात दाखवलं जातं की, तू तयार केलेल्या दुनियेतील महिला किती शक्तिशाली आणि सार्थक असतात'.

माही गिलची प्रतिक्रिया

ई टाइम्ससोबत बोलताना माही म्हणाली की, 'मला मुळात या मुद्द्यावर काहीच बोलायचं नाहीये. आपल्या चहूकडे तसंही खूप काही निगेटीव्ह होत आहे. कुणाचंही नाव घेणं फार सोपं झाल आहे. कारण काय तर त्याने(अनुराग) आम्हाला लॉन्च केलं होतं. मला केवळ इतकंच सांगायचं आहे की, मी अनुराग खूपप आधीपासून ओळखते. आम्ही गेल्या काही वर्षांपासून संपर्कात नाही आहोत. पण इतकं नक्कीच आहे की, अनुराग त्याच्या कोणत्याही कलाकाराला असं बोलू शकत नाही. आता मला यावर काहीही बोलायचं नाही'.

काय आरोप केले पायलने?

पायल घोषनं ट्विट करून कश्यपवर गंभीर आरोप केले. 'अनुराग कश्यपनं अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर जबरदस्ती केली. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा. या सर्जनशील व्यक्तीमागील राक्षस देशाला पाहू दे. यामुळे माझं नुकसान होऊ शकतं, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे. कृपया मदत करा,' असं आवाहन पायलनं केलं आहे.

कंगनाकडून अनुरागच्या अटकेची मागणी

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, अमली पदार्थांच्या वापरावर सातत्यानं बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं पल्लवी घोषचं ट्विट रिट्विट केलं आहे. प्रत्येकानं उठवलेला आवाज महत्त्वाचा आहे. अनुराग कश्यपला अटक व्हायला हवी, असं कंगनानं म्हटलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पायलच्या ट्विटची दखल घेतली आहे. पायलनं राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असं शर्मांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे पण वाचा :

अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....

पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट

तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली

टॅग्स :राधिका आपटेअनुराग कश्यपबॉलिवूड