Join us

राधिका आपटेने म्हटले, ‘लैंगिक शोषण केवळ चंदेरी दुनियेतच नव्हे तर प्रत्येक दुसºया घरात केले जात आहे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 4:29 PM

अभिनेत्री राधिका आपटेच्या मते, लैंगिक शोषण केवळ ग्लॅमर किंवा शोबिज जगतातच होते असे नाही तर, प्रत्येक दुसºया घरात असे ...

अभिनेत्री राधिका आपटेच्या मते, लैंगिक शोषण केवळ ग्लॅमर किंवा शोबिज जगतातच होते असे नाही तर, प्रत्येक दुसºया घरात असे प्रकार घडत असतात. राधिकाने म्हटले की, ‘लैंगिक शोषणाचे प्रकार प्रत्येक दुसºया घरात घडत असतात. त्यामुळे असे प्रकार केवळ चित्रपटनगरीचाच भाग आहे असे म्हणता येणार नाही. त्याचबरोबर राधिकाने हेदेखील म्हटले की, अशाप्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकविण्याची गरज आहे. त्यासाठी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला, पुरुष लहान मुले या प्रत्येकांनी समोर येऊन याचा विरोध करायला हवा. पुढे बोलताना राधिकाने म्हटले, मला असे वाटते की याची सुरुवात ‘नाही’ या शब्दाने होते. मग तुमच्यातील महत्त्वाकांक्षा कितीही मोठी का असे ना? त्यामुळे अशा प्रकारांबाबत तुम्हाला हिम्मत दाखविण्याची आणि स्वत:मधील प्रतिभेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे ‘नकार’ देण्यास सुरुवात करा. कारण जर एका व्यक्तीने याविषयी आवाज उठविला तर त्याचे कोणीही ऐकणार नाही. परंतु जर दहा लोक किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज बुलंद केला तर त्यांचे नक्कीच ऐकले जाईल. ‘फोबिया’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारणारी राधिका एमटीव्हीच्या आगामी ‘फेम-इस्तान’ या डिजिटल शोमध्ये मेंटरच्या रूपयात बघावयास मिळणार आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वे वाइंस्टीन याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप समोर आल्यानंतर याविषयी जगभरात एक मोहीम चालविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जगभरातील महिला त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना जाहीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमांतून सांगताना दिसत आहेत.