Join us

राधिका आपटेने नवऱ्याच्या वाढदिवशी दाखवली लेकीची पहिली झलक, शेअर केला 'तो' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:23 IST

राधिकाची लेक फक्त दोन महिन्यांची आहे. चिमुकलीची झलक पाहिलीत का?

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला. राधिकाने लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर येत प्रेग्नंट असल्याचं सरप्राईजच चाहत्यांना दिलं होतं. आता ती लेकीच्या संगोपनात व्यस्त असून कामही करत आहे. तसंच मदरहूडचा आनंद घेत आहे. आज राधिकाचा नवरा बेनेडिक्ट टेलरचा (Benedict Taylor) वाढदिवस असून तिने पोस्ट शेअर करत लेकीची झलक दाखवली आहे. 

राधिका आपटेची मुलगी फक्त दोन महिन्यांची आहे. राधिकाने इन्स्टाग्रामवर एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये लेकीचा चिमुकला हात आहे तर सोबत बेनेडिक्टचा हात आहे. तो लेकीला fist bump देत आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यात आला आहे. राधिकाने या फोटोसोबत लिहिले, "मोठा हात असलेल्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही खूप नशीबवान आहोत कारण तू आमच्यासोबत आहेस." फेवरिट व्यक्ती, बर्थडे बॉय आणि बॉक्सिंग बड्स असे हॅशटॅगही तिने दिले आहेत.

राधिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत भरभरुन प्रेम व्यक्त केलं आहे. पहिल्यांदाच तिने लेकीची थोडी का होईना झलक दाखवली आहे. मात्र तिचं नाव अद्याप राधिकाने सांगितलेलं नाही. नुकतीच राधिका बाफ्टा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तिथेही तिने वॉशरुममध्ये जात बाळासाठी ब्रेस्टमिल्क पंप केले. याचा फोटोही तिने आज शेअर केला होता. लेकीच्या जन्मानंतर एका आठवड्यातच राधिका कामावर परतली होती. तसंच प्रेग्नंसीत तिला आलेल्या अनेक आव्हानांविषयीही ती मुलाखतीत बोलली आहे.

एका हातात शॅम्पेन अन् त्याचवेळी दुसरीकडे ब्रेस्टमिल्क पंप करताना दिसली अभिनेत्री, नेटकरी भडकले

राधिकाने २०१२ साली बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. बेनेडिक्ट हा ब्रिटीश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकार आहे. लग्नानंतर १२ वर्षांनी दोघं आईबाबा झाले आहेत. 

टॅग्स :राधिका आपटेपरिवारसोशल मीडिया