Join us

राधिका आपटे पहिल्यांदाच झळकणार साय-फाय वेबसीरिज 'ओके कंप्यूटर'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 06:00 IST

अभिनेत्री राधिका आपटे लवकरच तिची आगामी वेबसीरिज ओके कंप्यूटरमध्ये झळकणार आहे.

अभिनेत्री राधिका आपटे लवकरच तिची आगामी वेबसीरिज ओके कंप्यूटरमध्ये झळकणार आहे. ती सीरिजबाबत खूप उत्साही आहे कारण सायन्स फिक्शन म्हणजेय साय-फायवर आधारीत तिचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. ओके कंप्यूटरची सहनिर्मिती आणि लेखन आनंद गांधीने केली आहे. निर्मिती व लेखन पूजा शेट्टीने केले आहे. तसेच तिने आणि नील पेडररने या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये राधिकासोबत विजय वर्मा, जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे.

राधिका आपटेने ओके कंप्यूटर या सीरिजबद्दल सांगितले की, डिजिटस माध्यमात बरेच प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर मी माझ्या पहिल्या साय फाय प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी उत्साही होते. विशेष म्हणजे यात मी साकारलेले लक्ष्मीचे पात्र. लक्ष्मी ही चांगली आणि शांत व्यक्ती आहे जी नवीन भवितव्याचा स्वीकार करते आणि रोबोटशी तिची माणसांप्रमाणे मैत्री आहे. लक्ष्मीची भूमिका साकारायला मला खूप मजा आली.

विजय वर्मा या सीरिजमध्ये साजनची भूमिका केली आहे. याबद्दल तो म्हणाला की, त्याच्या भूमिका नेहमी प्रखर राहिल्या आहेत आणि विनोदी क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्यासाठी उत्सुक होता. त्याने पुढे सांगितले की, मला जेव्हा ओके कंप्यूटरची स्क्रीप्ट ऑफर करण्यात आली तेव्हा मला वाटले की माझ्यासाठी प्रोग्राम केला आहे. या शोमध्ये जो रिसर्च केला आहे तो खूप चांगला आहे. त्यामुळे मी साजनची भूमिका साकारण्याची संधी सोडू शकत नव्हतो. अँटी टेक्नोलॉजी पोलीस अधिकारी. साजन बेपर्वा आणि मजेशीर आहे. त्याच्या याच गोष्टीवर माझे सर्वात जास्त प्रेम आहे. मी या भूमिकेसाठी खूप तयारी केली आणि शोध घेतला. मला आशा आहे की प्रेक्षक अशा भूमिकांवर तसेच प्रेम करतील जसे मी करतो.

ओके कंप्यूटर ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर २६ मार्चपासून पहायला मिळणार आहे. यात राधिका आणि विजय वर्मासोबत रसिका दुग्गल, विभा चिब्बर, सारंग सथाए, रत्नाबली भट्टाचार्ची आणि कानी कुसरुती हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :राधिका आपटे