Join us

रणवीर-दीपिकाची गुडन्यूज अन् राधिका मर्चंटच्या कपलला गुजरातीत शुभेच्छा; अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 18:21 IST

काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. अंबानींच्या होणाऱ्या सुनेने प्री वेडिंग सोहळ्यात रणवीर आणि दीपिकाला यासाठी गुजरातीतून शुभेच्छा दिल्या.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. १ ते ३ मार्चदरम्यान गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. अंबानींच्या या सोहळ्यात बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणही उपस्थित होते. 

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या डान्स परफॉर्मन्सने चार चांद लावले. या प्री वेडिंग सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. अंबानींच्या होणाऱ्या सुनेने प्री वेडिंग सोहळ्यात रणवीर आणि दीपिकाला यासाठी गुजरातीतून शुभेच्छा दिल्या. राधिका मर्चंटचा या सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

रणवीर-दीपिकाचा प्री वेडिंग सोहळ्यातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गरोदर असलेल्या दीपिकाने अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये डान्स केल्याने तिला ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान, राधिका आणि अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्याची संपूर्ण देशभर चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. आता जुलै महिन्यात ते दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणमुकेश अंबानीनीता अंबानी