२०१७ साली प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा ‘रईस’ हा बॉलिवूड चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. ‘रईस’मुळे माहिरा प्रसिद्धीझोतात आली होती. पण, या चित्रपटामुळे तिच्यावर टीकाही करण्यात आली होती. सध्या माहिरा गंभीर आजाराचा सामना करत आहे. माहिरा बायपोलार डिसऑर्डर या आजाराने त्रस्त असल्याचा खुलासा एका मुलाखतीत तिने केला आहे.
माहिराने नुकतीच ‘एफव्हाई पॉडकास्ट’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने तिच्या आजाराबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, “२०१६ साली उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. गेली सात ते आठ वर्ष मी या आजाराचा सामना करत आहे. मी औषधही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण, मला ते जमलं नाही. रईस चित्रपटात काम केल्यामुळे झालेल्या टीकेमुळे मला हा आजार झाला. मी तणावाखाली असल्याचं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं.”
"लॉकडाऊननंतर काम नव्हतं, पैसे संपले अन्...", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने सांगितला कठीण प्रसंग
“...म्हणून 'गदर २' सुपरहिट झाला”, हेमा मालिनींचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, “ओटीटी आणि वेब सीरिज...”
“मी औषधे खाणं बंद केल्यानंतर मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. मला उठताही येत नव्हते. मी आणखी तणावात गेले होते. यातून बरे होण्यासाठी मी अल्लाडकडे प्रार्थना करायचे. त्यानंतर मग मी पुन्हा औषधे खाणं सुरू केलं,” असा खुलासा माहिराने मुलाखतीत केला आहे.