Join us

प्रसिद्ध रॅपर रफ्तारचा मोडणार संसार; लग्नाच्या ६ वर्षांनंतर होणार पत्नीपासून विभक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:01 IST

Raftaar: सूत्रांच्या माहितीनुसार, रफ्तार आणि कोमल यांनी २०२० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

'बोटल', 'कमली कमली', 'बिअर बार' अशी असंख्य जबरदस्त गाणी बॉलिवूडला देणारा रॅपर रफ्तार सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. रफ्तार म्हणजेच दिलिन नायर लवकरच पत्नी कोमलपासून विभक्त होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही जोडी त्यांचा सहा वर्षांचा संसार मोडत विभक्त होणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगत असून रफ्तारने अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, रफ्तार आणि कोमल यांनी २०२० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र, कोविड काळात त्यांचा घटस्फोटाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, येत्या ६ ऑक्टोबर २०२२मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त होणार आहे.

रफ्तार आणि कोमल यांच्यात गेल्या कित्येक दिवसांपासून मतभेद निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी एकमेकांसोबतचे वा लग्नाचे फोटोही डिलीट केले आहे. 

रफ्तार-कोमलने केलं लव्ह मॅरेज

कोमल अभिनेता करण आणि कुणाल बोहरा यांची बहीण आहे. २०११ मध्ये कोमल आणि रफ्तार यांची एका पार्टीत पहिली भेट झाली होती. या भेटीनंतर जवळपास ५ वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं आणि २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. परंतु, आता ही जोडी लग्नाच्या ६ वर्षानंतर विभक्त होत आहे.

दरम्यान, रफ्तारने त्याच्या करिअरची सुरुवात एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. तसंच त्याने अनेक रॅपसॉन्सही तयार केले. तसंच 'रोडिज' आणि 'डान्स इंडिया डान्स 7' च्या परीक्षक पदाची भूमिकाही पार पाडली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड